टीईटी २०२१: शिक्षक पात्रता परीक्षेची नवीन तारीख जाहीर, आता ‘या’ तारखेपासून मिळणार प्रवेशपत्र

0
223
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुणेः शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी-२०२१) तारखांमध्ये बदल करण्यात आला असून नवीन वेळापत्रकानुसार आता २१ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना या परीक्षेसाठीची नवीन प्रवेशपत्रे २६ ऑक्टोबरपासून www.mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार परीक्षेसंबंधींच्या सूचना व इतर आवश्यक माहिती याच संकेतस्थळाला भेट देऊन मिळवू शकतात.

 यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार टीईटी-२०२१ ही ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार होती. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्धही करून देण्यात आली होती. परंतु देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच ही निवडणूक होत आहे.

चला उद्योजक बनाः सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १ कोटीपर्यंत प्रोत्साहन योजना, वाचा सविस्तर माहिती

नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा आता २१ नोव्हेंबर रोजी होणार असून या परीक्षेसाठी उमेदवारांना नव्याने प्रवेशपत्रे घ्यावी लागणार आहेत. हे प्रवेशपत्र पुढील आठवड्यात म्हणजेच २६ ऑक्टोबरपासून www.mahatet.in या संकेतस्थळाला भेट देऊन डाऊनलोड करता येईल. नवीन प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे लागेल.

उमेदवारांना डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्राची प्रिंट काढावी लागेल. ही प्रिंट घेऊनच त्यांना परीक्षा केंद्रावर जावे लागेल. या प्रवेशपत्रासोबतच उमेदवारांना त्यांचे ओळखपत्रही सोबत ठेवावे लागणार आहे. टीईटी-२०२१ ही परीक्षा कोविडच्या संपूर्ण मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनच आयोजित केली जाणार असून पेपर-१ आणि पेपर-२ साठी १५० मिनिटांच्या कालावधी दिला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा