औरंगाबादः औरंगाबादेतील स्वयंसिद्धा गतिमंद मुलांच्या शाळेच्या बसमध्ये घूसन एका अल्पवयीन गतिमंद मुलीला नको तिथे स्पर्श करून तिची छेड काढून विनयभंग करणाऱ्या तीन नराधमांविरुद्ध औरंगाबादच्या सातारा पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारात स्कूलबसचा चालकच सहभागी असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यूजटाऊनने (www.newstown.in) या प्रकरणावर प्रकाश टाकून गुंड टोळक्याकडून गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेला प्रकार उजेडात आणला होता.
औरंगाबाद जवळील वळदगाव येथील स्वयंसिद्धा विशेष मुलांच्या शाळेच्या स्कूलबसमध्ये घुसून तीन गुंड एका अल्पवीयन गतिमंद मुलीला नको तिथे स्पर्श करून छेड काढून विनयभंग करत होते आणि या किळसवाण्याप्रकाराचे चित्रिकरण करून ते व्हायरल करत होते. गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू होता. विशेष म्हणजे या आठ वर्षीय गतिमंद मुलीची छेडछाड करून विनयभंग आणि मारहाण करणारा एक जण स्कूलबसचाच चालक आहे. त्याचे नाव अविनाश शेजूळ असे आहे. त्याचे दोन मित्र मिळून या आठ वर्षीय गतिमंद मुलीची छेड काढत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका संपदा पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा पोलिसांनी स्कूलबसचा चालक अविनाश शेजूळ, अजय बरडे आणि कार्तिक भवर या तीन नराधमांविरुद्ध भादंविच्या कलम 354, 323, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंडांचे हे टोळके शाळेतील अन्य मुलांनाही मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अल्पवयीन गतिमंद मुलीची छेडछाड आणि विनयभंग करणारा हाच तो व्हिडीओ
Thanks news town aaj tumchaya mule samajatil.ase kide yogya thikano pohchavle jatay. Aani school bus madhe camara ha aselach pahije