संकट आपली पाठ सोडत नाही, संकटाच्या छाताडावर मात करून पुढे जावूः मुख्यमंत्री ठाकरे

0
91
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः एकामागोमाग एक संकटे येत आहेत. संकट आपली पाठ सोडत नाही, पण संकटाच्या छाताडावर मात करून आपण पुढे जाऊ, तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. वादळ धडकल्यानंतर जशी त्याची दिशा समजेल तशी सूचना दिली जाईल. कुठेही घाबरून वेडेवाकडे पाऊल टाकू नका. जसे आपण कोरोनाचे संकट परतवण्याच्या मार्गावर आहोत. तसेच या संकटाला देखील आपण सामोरे जावू. संकटाच्या छाताडावर चाल करून आपल्याला जायचे. त्यावर मात करून सहिसलामतीने बाहेर पडायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी सोशल मिडीयावरील लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. ते म्हणाले, काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला होता. केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत आहे. काळजी करू नये. हे वादळ येण्यापूर्वी आपण पुनश्च हरि ओम करणार होता. उद्या परवा घराबाहेर पडू नका. घराबाहेर न पडणे, यात आपले हित आहे. मनुष्यहानी होऊ नये, याची काळजी घेतली. किनारपट्टीतील सर्व मच्छिमारांशी संपर्क झाला आहे. पुढचे दोन दिवस समुद्रात जायचे नाही. हे करताना काही गोष्टीची खबरदारी घेण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 हे वादळ अलिबागमध्ये धडकण्याची शक्यता आहे. मुंबई,पासून किनारपट्टीतील नागरिकांनी काळजी घ्यावी. सर्वांनी सावध राहावे. ग्रामीण किंवा शहरी भागात आपल्या घराभोवती पडलेल्या वस्तू घरात आणून ठेवा. मुसळधार पाऊस पडणार आहे. पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. या काळाज वीज पुरवठा खंडीत होऊ शकतो. अनावश्यक वीजेचा वापर करू नका. उपकरे चार्ज करून ठेवा. आपली औषधं जागी ठेवा. करोनाचे संकट आहे. एकामेकांमागोम संकट येत आहे. निसर्ग मात्र पाठ सोडत नाही, असे ठाकरे म्हणाले.

दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सूचनांकडे लक्ष द्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. स्थानिक प्रशासन सज्ज आहे. धोक्याच्या पट्ट्यातील नागरिकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करत आहोत. प्रशासन दक्ष आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. आपल्याला वेळत सुरक्षित जागी हलवण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष द्या. ग्रामीण भागातील नागरिकांनी तात्पुरत्या निवाऱ्यात जावू नका. आपण राज्यात कोरोनावर उपचार करण्यासाठी जम्बो ह़ॉस्पिटल तयार केले आहे. वादळाचा इशारा आला तेव्हा हे शेड दुसरीकडे हलवले. नागरिकांना इजा होऊ द्यायचे नाही आहे. ब्रांद्रा कुल्यातील रुग्णांना इतरत्र हलविले आहे. हे वादळ मुसळधार पाऊसासोबत येत आहे. प्रशासनाने निश्चित केलेल्या जागी जा. ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडीत केला जाईल. पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा