आता नो किसिंग झोन!: मुंबईतील ‘या’ भागात जोडप्यांना किस करण्यावर प्रतिबंध

0
429
छायाचित्रः सोशल मीडिया

मुंबईः तुम्ही आजपर्यंत नो पार्किंग झोन, नो किसिंग झोन, नो हॉर्न झोन अशा पाट्या वाचल्या असतील. पण तुम्ही नो किसिंग झोन असल्याची पाटी कधी वाचली आहे का? पण असा किसिंग झोनही आहे आणि तो काही परदेशात नाही तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबईतच आहे. मुंबईतील हा नो किसिंग झोन सध्या चांगलाच चर्चेत आहे.

मुंबईतील बोरीवली पश्चिममधील सत्यम शिवम सुंदरम सोसायटी हा हाय प्रोफाईल भाग. या हाय प्रोफाईल सोसायटीत असलेल्या जॉगर्स पार्कमध्ये अनेक तरूण जोडपी येतात. या जॉगर्स पार्कजवळच अनेक तरूण जोडपी भररस्त्यातच अश्लील चाळे करत किसिंग करतात. कोरोनाचा लॉकडाऊन लागू झाल्यापासून तर सायंकाळी पाच वाजेपासून रात्री उशीरापर्यंत जोडप्यांचे हे चाळे वाढले आहेत. दुचाकी, चारचाकीमध्ये किंवा भररस्त्यात उभे राहून जोडप्यांचा खुलेआम रोमांस चालतो.

हेही वाचाः टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने जिंकले कांस्यपदक!

या भागातील नागरिकांनी या जोडप्यांना येथून पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु ही तरूण जोडपी काही ऐकायचे नाव घेईनात. काहीच तोडगा निघत नसल्याचे पाहून येथील रहिवाश्यांनी चक्क रस्त्यावरच ‘नो किसिंग झोन’ असे लिहून टाकले. जॉगर्स पार्कबाहेरच्या रस्त्यावर मोठ्या अक्षरात नो किसिंग झोन लिहिण्यात आले. असे लिहिण्याचा परिणाम लगेच जाणवला आणि किसिंग करणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत लक्षणीय घटही दिसून आली आहे.

हेही वाचाः चक दे इंडियाः ग्रेट ब्रिटनचा धुव्वा उडवत भारतीय पुरूष हॉकी संघ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत!

 आमचा तरूण जोडप्यांच्या प्रेमाला आणि त्यांच्या किसिंगला विरोध नाही. परंतु आम्ही आमची सोसायटी किंवा आमच्या घराबाहेरचा परिसर किसिंग झोन होण्याची परवानगी देऊ शकत नाही. प्रारंभी येथील नागरिकांनी या जोडप्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु येथे येऊन किसिंग करणे जोडप्यांचे नेहमीचेच झाल्यामुळे नो किसिंग झोन असे या परिसराला नाव देण्याची कल्पना पुढे आली, असे कैलासराव देशमुख या रहिवाश्याने सांगितले.

हेही वाचाः धमकी देऊ नका, एक थापड अशी देऊ की पुन्हा उठणारही नाहीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

हेही वाचाः ‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा, शासन आदेश जारी

नामी शक्कल आली कामीः सुरूवातीला या भागातील नागरिकांनी किसिंग करणाऱ्या जोडप्यांचे मोबाइलवर व्हिडीओ काढले. ते या भागातील नगरसेवकाला दाखवले आणि काही तरी उपाय शोधण्याची विनंती केली. मात्र नगरसेवकाने हे व्हिडीओ पोलिसांना दाखवा, असे सांगितले. पोलिसांना याची खबर देऊनही काहीच कारवाई होत नसल्यामुळे येथील नागरिकांनी नो किसिंग झोन जाहीर करण्याची नामी शक्कल लढवली आणि ही नामी शक्कल एवढी कामी आली की या भागात जोडप्यांचे किसिंग लक्षणीय प्रमाणात घटले आहे. मुंबईतील हा नो किसिंग झोन सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा