महाराष्ट्रात मध्य प्रदेशसारखी स्थिती निर्माण होणार नाहीः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना विश्वास

0
141
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस विरोधात बंड केल्यामुळे मध्य प्रदेशात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. शरद पवार यांनी आज विधानभवनात येऊन राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडाचे पडसाद मध्य प्रदेशात उमटले असले तरी महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. महाराष्ट्रातील स्थिती उत्तम आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे सक्षम आहेत. मात्र मध्य प्रदेश सरकारबद्दल साशंकता असल्याचेही पवार म्हणाले. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी शरद पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा