मराठीसह आठ प्रादेशिक भाषांमधून आता इंजिनिअरिंगचे शिक्षण!

0
162
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजेच एआयसीटीईने मराठीसह आठ प्रादेशिक भाषांमधून इंजिनिअरिंगिचे शिक्षण देण्याची परवानगी दिली आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून प्रादेशिक भाषांत इंग्रजीचे शिक्षण घेता येईल. मराठीशिवाय हिंदी, बंगाली, तेलूगू, तामिळ, गुजराती, कन्नड आणि मल्याळम या भाषातून इंजिनिअरिंग शिकवले जाईल.

ग्रामीण आणि आदिवासी भागात अनेक हुशार विद्यार्थी असतात. परंतु इंग्रजीच्या धास्तीमुळे त्यांचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. या निर्णयामुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान आणि चीन यासारख्या प्रगत देशात संपूर्ण शिक्षण त्यांच्या देशाच्या अधिकृत भाषेतच दिले जाते.

इंजिनिअरिंगचे ज्ञान चांगल्या प्रकारे अवगत होऊन त्यांचा पाया मजबूत व्हावा, विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण देण्याचा उद्देश आहे. आमच्याकडे देशभरातून ५०० अर्ज आले आहेत. इंजिनिअरिंगचे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आणखी ११ प्रादेशिक भाषांमधून शिकवण्याची आमची योजना आहे, असे एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्ध टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

एआयसीटीईकडून इंजिनिअरिंगच्या अंडर ग्रज्युएट अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके प्रादेशिक भाषांत भाषांतरित करण्यात येत आहेत. स्वयंम आणि ऑनलाइन ओपन कोर्सेससाठी लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पुस्तके, नोट्सचे भाषांतर करण्यात येत आहे, असे सहस्त्रबुद्धे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा