इंजिनिअर होण्यासाठी आता बारावीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सची गरज नाही!

0
414
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिली आहे. बारावीच्या विद्यार्थ्याने गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे तीन विषय घेतले नसतील तरीही त्याला इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल, असे नवे धोरण एआयसीटीईने जाहीर केले आहे.

एआयसीटीईच्या नवीन धोरणानुसार आता इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असणे गरजेचे नाही. हे विषय आता वैकल्पिक करण्यात आले आहेत. त्यामुळे या विषयाचा अभ्यास कठीण जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

एआयसीटीईने इंजिनिअरिंगसाठी १४ विषयांची यादी जाहीर केली असून या यादीतील कोणत्याही तीन विषयांत विद्यार्थ्याने किमान ४५ टक्के गुणांसह बारावी उतीर्ण केल्यास त्याला इंजिनिअरिंगला प्रवेश घेता येणार आहे.

एआयसीटीईने जाहीर केलेल्या १४ विषयांत गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट्स, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, उद्योजकता आदी विषयांचा समावेश आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी एआयसीटीईने हँडबूक जारी केले असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा