शिर्डी साई संस्थानच्या अधिकाऱ्याने साईभक्त महिलांना मोबाइलवर पाठवले अश्लील मेसेज!

0
268
प्रातिनिधिक छायाचित्र.

अहमदनगरः शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्याकडून काही साईभक्त महिलांना मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा अधिकारी साई संस्थानच्या जनसंपर्क विभागात कार्यरत आहे. आसाम आणि मुंबईतील काही साईभक्त महिलांनी याबाबत संस्थानकडे तक्रार केली असून याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे केली आहे.

साई संस्थानच्या जनसंपर्क विभागातील एका अधिकाऱ्याने मुंबई आणि आसाममधील काही साईभक्त महिलांशी प्रथम विविध कारणांनी जवळीक साधली. त्यानंतर त्यांना मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाठवले. या महिलांनी साई संस्थानकडे याबाबत तक्रार केली आहे. या महिलांची लेखी तक्रार घ्यावी आणि चौकशी करून दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या राहता तालुका संघटक स्वाती सुनील परदेशी यांनी बानायत यांच्याकडे केली आहे.

चला उद्योजक बनाः सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १ कोटीपर्यंत प्रोत्साहन योजना, वाचा सविस्तर माहिती

शिर्डीचे साई संस्थान हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आहे. या ठिकाणी असे प्रकार होता कामा नये. आपण एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी आहात. त्यामुळे महिला भक्तांच्या आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या गंभीर प्रकरणात आपण लक्ष घालून संबंधिताची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणीही परदेशी यांनी निवेदनात केली आहे. परदेशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, साई संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेही या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा