दिवाळीत एसटीच्या दररोज एक हजार जादा फेऱ्या

0
17
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः दिवाळीत प्रवासी पर्यटकांची वाढती गर्दाr लक्षात घेऊन एसटी महामंडळाने यंदही ११ ते २२ नोव्हेंबर  या कालावधीत दररोज सुमारे १ हजार  विशेष जादा गाडया सोडणार आहे. या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकावरून सुटणार असुन, त्या टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल परब यांनी दिली आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने जादा बस फेऱ्या सुरु करण्याचे नियोजन केले आहे. या बाबतीत प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन दिवाळी सणानिमित्त होणारी जादा वाहतूक निर्विघनपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना एसटी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आवश्यक त्या सर्व सूचना व नियमांचे काटेकोर पालन करीत सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देश स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाच्या मुख्यालयातून दिले आहेत. आगाऊ आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा