पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याचे अनावृत्त पत्र

11
5469
संग्रहित छायाचित्र.

लोकशाहीचा अर्थ केवळ निवडणुका जिंकणेच नव्हे तर लोकशाही मूल्यांचे सृजन करतील अशा संस्थांची निर्मिती करणेही आहे, यावर प्रकाश टाकावा म्हणून हे सर्व लिहितो आहे. राजीव गांधी यांनी आपल्या छोट्याशा कार्यकाळात याची मुहूर्तूमेढ रोवली. तुम्ही असे काय केले, हे तुम्ही सांगितले पाहिजे!

 • अरविंद कुमार (लेखक जवाहर नवोदय विद्यालय, फैजाबादमध्ये शिकलेले आहेत आणि सध्या ते रॉयल हॉलवे लंडन विद्यापीठात पीएच.डी. करत आहेत.)

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबतचे आपले विचार ऐकून तुम्हाला हे पत्र लिहिण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही. त्याचे कारण मी किंवा माझे कुटुंब काँग्रेसी आहे, असे अजिबात नाही. माझे काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचारसरणीशीही काहीही घेणेदेणे नाही. देशातील राजकीय चर्चेची खालावलेली पातळी हा माझ्या चिंतेचा विषय आहे आणि तेच हे पत्र लिहिण्याचे कारण आहे. लोकशाहीच्या विकासबरोबरच सुदृढ समाज निर्मितीसाठी राजकीय चर्चा आवश्यक आहेच. आपल्या देशातील लोकशाहीचा अर्थ केवळ निवडणुकांपुरता मर्यादित चालला आहे, त्याचे कारण चर्चेचा अर्थ आरोप- प्रत्यारोपांपर्यंतच मर्यादित झाला आहे. खरे तर लोकशाहीत चर्चेचा अर्थ तर्क-वितर्क असतो. ही माझी चिंता आहे. निवडणुकीशिवाय लोकशाहीचा अर्थ नागरिकांत देशभक्ती, धैर्य, दया, करूणा, मानवी प्रतिष्ठेचे सन्मान यासारख्या मूल्यांचा विकास करणे हा ही आहे.

तशी तुमची चिंता कमी करण्यासाठी मी सांगू इच्छितो की, आधुनिक लोकशाहीत आलेली ही विकृती केवळ भारतापुरतीच मर्यादित नाही तर स्वतःला विकसित म्हवणाऱ्या देशांतही ही समस्या पहायला मिळते आहे. जर तुमचा माझ्या म्हणण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही तुमचे मित्र बराक ओबामा यांना विचारू शकता. मी तर म्हणेन की, निवडणुकीनंतर जेव्हा पुढच्या वेळेला तुम्ही अमेरिकेला जाल, तेव्हा तुमचे मित्र ओबामा यांना त्यांचे मित्र प्रोफेसर मायकेल सँडल यांच्याशी भेट घालून देण्याचा आग्रह धरा. कारण त्यांनाही आधुनिक लोकशाहीत चर्चेच्या खालावलेल्या पातळीबद्दल प्रचंड चिंता आहे.

…………………………………
राजीव गांधी १९८४ ते १९८९ असे पाचच वर्षे देशाचे पंतप्रधान होते. पंतप्रधानपदाच्या या छोट्याशा कार्यकाळात त्यांनी भारतीय व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. मात्र नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांची प्रतिमा भ्रष्टाचाराचे प्रतिक म्हणूनच सादर केली आहे. परंतु कोणाच्याही जीवनाकडे समग्रतेने बघायला हवे आणि त्याच क्रमाने राजीव गांधी यांच्या शालेय शिक्षणाचे धोरणही बघायला हवे.
…………………………………

खरे तर, लंडनला येण्यापूर्वी मी दिल्ली विद्यापीठाच्या सत्यवती महाविद्यालयात अतिथी प्रोफेसर म्हणून राज्यशास्त्र शिकवत होतो आणि माझ्या विद्यार्थ्यांना लोकशाहीबद्दल शिकवत असताना मायकेल सँडल यांचे यूट्यूबवर असलेले ‘लॉस्ट आर्ट ऑफ डेमॉक्रेटिक डिबेट’ न चुकता ऐकवत होतो.

असो, मूळ मुद्यावर येतो. राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स तोफ घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे आरोप झाले, १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीदरम्यान मौन बाळगणे आणि एवढेच नव्हे तर दंगलखोरांना चिथावणी देणारी वक्तव्य केल्याचे आरोपही त्यांच्यावर झाले, हे तुमचे म्हणणे खरे आहे. परंतु त्यांच्यावरील हे आरोप कधीच सिद्ध झाले नाहीत, हेही लक्षात ठेवायला हवे.

आता देशातील जनतेने राजीव गांधींना का स्मरणात ठेवायचे हा प्रश्न आहे. देशातील त्यांना त्यांना दक्षिण आशियातील दहशतवादाविरोधात लढताना हौतात्म्य पत्करणे, माहिती आणि तंत्रज्ञान क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणे, पहिल्या पिढीच्या आर्थिक सुधारणा लागू करणे आणि शिक्षणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व योगदान, विशेषतः माध्यमिक शिक्षणात क्रांतिकारक सुधारणा घडवून आणल्याबद्दल देशातील जनता त्यांचे स्मरण करते.

राजीव गांधी यांनी शालेय शिक्षणाच्या धोरणात घडवून आणलेल्या बदलाचा मी लाभार्थी आहे, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात त्यांनी घडवून आणलेल्या सुधारणांची तुम्हाला ओळख करून द्यावी, अशी विचार माझ्या मनात आला आहे.

लोक सांगतात की, राजीव गांधी आपल्या सरकारच्या धोरणांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी एका शाळेत गेले, तेथे त्यांनी एका विद्यार्थ्याला एक सामान्य प्रश्न विचारला. तो विद्यार्थी उत्तर देऊ शकला नाही, त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले. राजीव गांधींनी आश्चर्य व्यक्त केल्यानंतर तो विद्यार्थी त्यांना म्हणाला की, ‘मी डून स्कूलमध्ये थोडाच शिकलेला आहे…’ राजीव गांधी प्रसिद्ध डून स्कूलमध्ये शिकले होते, हे येथे ध्यानात घेतले पाहिजे. राजीव गांधींनी त्या विद्यार्थ्याला उत्तर दिले की, ‘मी तुम्हाला डून स्कूलमध्ये तर शिकवू शकत नाही, परंतु तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी डून स्कूलसारख्या शाळा आवश्य सुरू करेन.’

या घटनेनंतर राजीव सरकारने देशात नवीन शिक्षण धोरण आखले, त्याअंतर्गत शिक्षण राज्यसूचीमधून काढून समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले. शिक्षण मंत्रालयाचे मनुष्यबळ विकास मंत्रालयात रूपांतर करण्यात आले. नव्या शैक्षणिक धोरणानुसार देशाच्या ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी नवोदय विद्यालयाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. प्रयोग म्हणून सर्वात आधी अमरावती आणि इज्जरमध्ये  दोन विद्यालये सुरू करण्यात आली आणि वर्षभरातच १९८६ मध्ये देशातील अन्य ६१ जिल्ह्यांत दुसऱ्या टप्प्यात नवोदय विद्यालये सुरू करण्यात आली. मी ज्या नवोदय विद्यालय, फैजाबादमध्ये शिकलो आहे, ते दुसऱ्या टप्प्यात स्थापन झाले होते.

 राजीव गांधींनी ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालयाचे जे मॉडेल तयार करून घेतले, त्यानुसार सहावी ते बारावी इयत्तेपर्यंत मोफत शिक्षणाची तरतूद होती, त्यात जेवण, निवास, कपड्यापर्यंतचीही तरतूद होती. नंतर वाजपेयी सरकारने सामान्य वर्गांतील विद्यार्थ्यांना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. राजीव गांधींनी नवोदय विद्यालयाची जी मूळ संकल्पना मांडली होती, त्यात देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालयाची तरतूद होती, त्यात नववीपर्यंत विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकवल्या जातात. या तीन भाषांत इंग्रजी, हिंदीशिवाय तिसरी भाषा म्हणून  अन्य कोणत्याही राज्याची भाषा शिकवण्याची तरतूद होती.

येथे फक्त भाषाच शिकवली जात नव्हती, तर का राज्यातील विद्यार्थ्याला दुसऱ्या राज्यातील भाषा आणि संस्कृतीबद्दल माहिती व्हावी म्हणून प्रत्येक नवोदय विद्यालयात नवव्या इयत्तेत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतराची तरतूदही होती. राजीव गांधींच्या या धोरणाचा मूळ उद्देश देशाची एकता आणि अखंडता भक्कम करणे होता. मात्र हा बिगर हिंदी भाषक राज्यांवर हिंदी थोपवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत तामिळनाडूने नवोदय सिस्टिमला विरोध केला. परिणामी आजही तामिळनाडूमध्ये नवोदय विद्यालये उघडू शकली नाहीत. राजीव गांधींनी नवोदय व्यवस्थेत अनुसूचित जाती आणि जमातीशिवाय मुली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षणही उपलब्ध करून दिले.

राजीव गांधींच्या स्वप्नाचा परिणाम म्हणून आज नवोदय विद्यालयात शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी प्रशासकीय सेवा, अध्यापन, डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, पत्रकारिता यासारख्या क्षेत्रात कार्यरत आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी असे आहेत की, ज्यांच्या आईवडिलांनी महाविद्यालय-विद्यापीठ पाहिलेलेही नाही. प्रत्येक वर्षी नवोदय विद्यालय सीबीएसईच्या निकालात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरच रहाते.

लोकशाहीचा अर्थ केवळ निवडणुका जिंकणेच नव्हे तर लोकशाही मूल्यांचे सृजन करतील अशा संस्थांची निर्मिती करणेही आहे, यावर प्रकाश टाकावा म्हणून हे सर्व लिहितो आहे. राजीव गांधी यांनी आपल्या छोट्याशा कार्यकाळात याची मुहूर्तूमेढ रोवली. तुम्ही असे काय केले, हे तुम्ही सांगितले पाहिजे!
सौजन्यः दि प्रिंटवर प्रसिद्ध झालेल्या मूळ हिंदी लेखाचा मराठी अनुवाद.

11 प्रतिक्रिया

 1. मोदींनी काय केले हे जो विचारत आहे त्यानी मोदींना सल्ला देणे , हे हस्यास्पद आहे . सर्व धर्म सहिष्णुता आणी लांगुलचालन ह्याचा अभ्यास करा . मोदींचे किती अनुयायी आहेत ,हे पहा , आणी तुमचे पहा . अतिररेकी हल्ले कमी झाले , भ्रष्टाचार कमी झाला , चिनवर पण आपण दबाव आणु शकतो हे मोदी आल्यानंतर समजले , पाक आता जेरीस आला आहे , जगातील बहुसंख्य देश भारताच्या पाठीशी आहेत , हे कधी पहायवा मिळाले न्हवते .

  • माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी. यांनी देखील बरीच कार्य केली STD. PCO.त्यानीच चालू केली त्याना कार्यकाल कमी भेटला मोदी सरकार सुद्धा भरपूर काम करत आहे याना कालावधी भरपूर मिळालेला आहे त्यामुळे मोदी सरकार चे काम दिसून येत आहे

 2. Yes. Navodaya school are doing well in all over India. Bright students from remote areas ,small villages or city dweller with differnt caste,culture,religion,gender are studying together…what is equality and equity other than this. Future of country lies in spirit of student and That is what identity of nation stand in worldwide.No doubt Navodayas are making them world champion who even not knowing that they are having legs. Building national interation,imparting equal and quality education,employment in form of personnel working for school, and many more benifits. With advisory vision of “come to learn and go to serve”.Thats all,this all things can only done by a great visionary and Nation builder and so were former PM late Mr.Rajiv Gandhi.
  Thanku to Arvind bhaiya.

 3. Modini je kel te aadhichya srkarne hi kel pan tyach tyani tv varun prachar/marketing kel nahi jar tyani kahi kel nasat tar 70 varsh desh challach nasata. Ulat aattachya srkarne sagali deshachi sampati vikun deshala kangal kel. News channel tar vikale gele ahet te je dakhavtat tech apan bolnaar kadhi social media bagha bharpur kahi pahnyaa sarkhi ahe. Mag kalel kon bare hote. Fakt andh bhat hou naka desh bhakt vha mag sarkar konachehi aso. Deshasathi awaj uthlach pahije.

  • maf kara pan tumi mhatal ki adhichya srkar ne marketing kel nahi manya modi ji ne je kahi kel te adhichya srkar ne pan kel.
   tumhi je mhatal ki tv vr prachar nahi kela. aho pan jya yojana tumhi kadhalya pan kadhich janteparynt pohochlya nahit tyachi marketing tumhi kashi krnar ….
   yojana kadhlya pan fkt netyanchi khishe bharnyasathi ….
   modiji ne navin kahi kel nahi pan pratek yojna jnteprynt pohochvlya …
   kiti tr garib lokana yacha fayda zala.
   kiti tr lokana ghar bhetli
   aaj pakistan chya prtek Hamlela yogya te uttar dil jat. kiti tari desh aaj bharat chya mage ahet ..
   aho te soda pan corona chya bhayankar kalat sudhha jvl jvl srv desh modiji na follow krt ahet ya eka karan varun kalat ki modiji chi kam karanyachi shaily kashi ahe ..
   social media cha mhatal tr jagat sarvat jast lok tr modiji na ch follow krtat
   desh kangal tr zala ch nahi ya ulat desh pragati chya margane jat ahe…
   kahi agav bolalo asel tr mafi asavi……

 4. We the students of municipal and zila parishad schools of nation want to write more descriptive letter to all leader of nation ( including gandhi family ) …
  Will Newstown dare to publish it….?
  I willl contact you soon….

 5. How many students learn in navodaya ..?
  Bulk of students go to municipal and zila Parishad schools ..who will take responsibility of these schools..?
  Media like Newstown want to politicise issue instead of genuine approach to problem…

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा