केशरी रेशन कार्डधारकांनाही जूनमध्ये सवलतीच्या दरात प्रतिव्यक्ती १ किलो गहू, १ किलो तांदूळ!

0
442
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. द्रारिद्र्य रेषेवरील म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात प्रतिव्यक्ती १ किलो गहू आणि १ किलो तांदूळ सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मागील लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य वाटपाचा लाभ देण्यात आला होता. या पुन्हा या योजनेअंतर्गत जून महिन्यात केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे भुजबळ म्हणाले.

 राज्यात ७१ लाख ५४ हजार ७३८ केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाचा त्यांना मोठा फायदा मिळणार आहे. राज्यात सध्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्याचे वाटप सुरू आहे. आता दारिद्रय रेषेवरील म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीच्या दरात अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे भुजबळ म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा