पालघर मॉबलिंचिंगमध्ये धार्मिक कारण नाही, उगाच जातीय रंग देऊन आग लावू नकाः मुख्यमंत्री ठाकरे

0
173
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : पालघर येथे घडलेली मॉबलिंचिंगची घटना अफवा आणि गैरसमजातून झाली आहे. त्याला कोणतेही धार्मिक कारण नाही किंवा धर्मांतधाही नाही. त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन आग लावण्याचे काम करू नका. या प्रकरणाला जातीय वळण देणे अतिशय चुकीचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोशल मिडीयावरील लाइव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

लॉकडाऊन असताना हे दोन साधू सरळ मार्गाने जाता येत नाही म्हणून दुर्गम भागातून जात होते,गुजरातच्या दिशेने त्यांना अडवून त्यांना परत पाठवलं गेलं.हा दुर्गम परिसर असल्याने त्यांच्यावर गैरसमजुतीने हल्ला झाला आणि त्यात त्यांची दुर्दैवी हत्या झाली. जे दोन साधू होते ते या दुर्गम भागातून जात होते. गैरसमजुतीने त्यांची हत्या झाली. मॉब लिंचिंगसारख्या लांच्छनास्पद घटना पालघरजवळ घडली. गडचिंचली या दुर्गम पाड्यात तिघांची हत्या झाली. यामध्ये धार्मिक कारण नाही. मॉब लिंचिंग घडले ते गाव पालघरपासून ११०  किमी अंतरावर आहे. दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ हा प्रकार घडला. गडचिंचली या गावात जायला महाराष्ट्रातून नीटसा रस्ता नाही, असे ठाकरे म्हणाले.

दोन साधू गुजरातला या दुर्गम भागातून जात होते. गैरसमजुतीने त्यांची हत्या झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल सरकारकडे मागितला आहे. एसपींनी मध्यरात्री १२.३० वाजता जाऊन कारवाई केली. पहाटे ५ वाजेपर्यंत जंगलातून १०० जणांना पकडले.  पाच मुख्य आरोपी गजाआड केले.  या प्रकरणातील कोणालाही माफ करणार नाही. दोन पोलिसांचेही निलंबनही करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा