भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वामुळेच पंकजा मुंडे, रोहिणींचा पराभव, ओबीसी नेतृत्व मागे खेचलेः एकनाथ खडसे

0
81
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवाला भाजपचे वरिष्ठ नेतेच जबाबदार आहेत. भाजपने अंतर्गत राजकारणातून पंकजा आणि रोहिणी यांना पाडले. विधानसभा निवडणुकीत पक्षांर्तगत कुरघोड्या तर झाल्यास परंतु त्यांना पाडण्याचे उद्योगही झाले. या पराभवामुळे भाजपतील ओबीसी नेतृत्व मागे खेचले गेले, असा घणाघाती आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

 खडसे यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वारच तोफ डागली. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव करून राज्यातील ओबीसी नेतृत्वच मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुजन समाजाला डावलण्यासाठीच हे कारस्थान करण्यात आले आहे. या पराभवामुळे राज्यातील ओबीसी नेतृत्वही हरपले. पक्षातील कोणत्याही अंतर्गत घडामोडींना पक्ष जबाबदार नसतो, तर पक्षनेतृत्व दोषी असते, असे खडसे म्हणाले. खडसे यांनी वरिष्ठ नेतृत्व असा उल्लेख करताना कुणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा सगळा रोख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

हेही वाचा: पंकजांच्या महत्वाकांक्षेला बीडमध्येच खोडा, सुरेश धसांनाच हवे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद!

भाजपमधील नाराजांचा एकत्र करण्याचा तुमचा प्रयत्न आहे का, विचारले असता नाराजांना एकत्र करण्याची गरज नसते. ते आपोआप एकत्र येत असतात, असे वक्तव्यही खडसे यांनी केले. त्यामुळे आगामी काळात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: भाजपने कायम ओबीसी नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, पंकजा मुंडेचेही त्यामुळेच खच्चीकरण !

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा