करूणा शर्माला घेऊन परळी पोलिस अंबाजोगाईकडे रवाना, आज सत्र न्यायालयात हजर करणार

0
414
संग्रहित छायाचित्र

बीडः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्याची घोषणा करून परळीत आलेल्या मुंबईच्या करूणा शर्मा यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. परळी शहर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या करूणा शर्मा यांना घेऊन पोलिस अंबाजोगाईकडे रवाना झाले आहेत. आज दुपारी त्यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.

करूणा शर्मा काल रविवारी दुपारी परळीत दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासह काही लोकही आले होते. परळीत आल्यानंतर करूणा शर्मा यांनी वैजनाथाच्या पायरीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धनंजय मुंडे समर्थकांनी त्यांना अडवून घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तेथे मुंडे समर्थक आणि करूणा शर्मा यांच्यात बाचाबाचीही झाली. परिस्थिती चिघळू नये म्हणून परळी शहर पोलिस करूणा शर्मा यांना घेऊन पोलिस ठाण्यात गेले. तेथे गेल्यानंतर त्यांच्या गाडीची झाडाझडती घेतली असता त्यांच्या गाडीत पिस्टल आढळून आले.

हेही वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

पोलिस या पिस्टल प्रकरणाची चौकशी करत असतानाच विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादीवरून करूणा शर्मा, अरूण मोरे यांच्याविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल दुपारपासूनच करूणा शर्मा व त्यांचे अन्य दोन सहकारी परळी शहर पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता त्यांना घेऊन परळी शहर पोलिस अंबाजोगाईकडे रवाना झाले असून आज दुपारी त्यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा