ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ

0
135
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करुन तो १५०० रुपये इतका करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

ग्रामपंचायतस्तरावरील मुलभूत गरजा पुरवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून त्यात महत्वाची भूमिका ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे पंचायत समितीस्तरावर, जिल्हा परिषदस्तरावर, महसूल विभागात जिल्हाधिकारी कार्यालयात, विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामसेवक /ग्राम विकास अधिकारी यांना बैठकांना हजर रहावे लागते.

ग्रामीणस्तरावर दिवाबत्ती, पाणीपुरवठा साहित्य, आरोग्याशी संबंधी साहित्य, वेगवेगळ्या योजनांचे बांधकाम साहित्य तसेच कर वसुली भरण्याकरीता तालूका स्तरावर जावे लागते. बचतगटांच्या कर्जमंजुरीसाठी तालुका पातळीवर बॅंकांना भेटी द्याव्या लागतात. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींना घर बांधणीचे सामान उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांच्यासोबत फिरावे लागते.

ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीमार्फत केल्या जाणाऱ्या कामाच्या पूर्ततेसाठी ग्रामसेवकांना फिरती करावी लागते. या सर्व मुद्द्यांचा विचार करता ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना ठोक स्वरुपात दरमहा देण्यात येणाऱ्या ११०० रुपये या कायम प्रवास भत्त्याच्या रक्कमेत सुधारणा करणे गरजेचे होते. त्यामुळे आता या भत्त्यात वाढ करून तो १५०० रुपये करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा