पेट-२ ऑनलाइन परीक्षा आता होणार विद्यापीठाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवरच!

0
462
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः पीएच.डी. साठी घेण्यात येणारी पेट-२ ही ऑनलाइन परीक्षा आता विद्यापीठाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवरच ऑनलाइन पद्धतीने होईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कळवले आहे.

यापूर्वी  पेट २ ही ऑनलाइन परीक्षा परीक्षार्थ्यांनी घरूनच देण्याबाबतच्या सूचना ३० डिसेंबर रोजी विद्यापीठाने जारी केल्या होत्या. मात्र आता कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी हा निर्णय बदलला असून आता ही परीक्षा विद्यापीठाने निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीनेच होईल, अशा सुधारित सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

विद्यापीठाने निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थ्यांना संगणक आणि इंटरनेट सुविधा पुरवण्यात येणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जारी केले जाईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट-२ परीक्षेच्या समन्वयकांनी कळवले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा