महागाईचा भडकाः राज्यातील अनेक शहरात पेट्रोल शंभरी पार!

0
31
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. एकट्या मे महिन्यातच पेट्रोलियम कंपन्यांनी तब्बल १५ वेळा दरवाढ केली आहे. गुरूवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात २४ पैसे तर डिझेलच्या दरात २९ पैसे वाढ केल्यामुळे राज्यातील अनेक शहरांत पेट्रोल शंभरी पार गेले आहे.

मे महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी तब्बल पंधरा वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली. आज पेट्रोलियम कंपन्यांनी कोणतीही दरवाढ केली नसली तरी गुरूवारी केलेल्या दरवाढीमुळे राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने शतक पार केले आहे. शंभरी पार केलेली राज्यातील शहरे अशीः

 • अमरावतीः १००.४९ रुपये.
 • औरंगाबादः १००.९५ रुपये.
 • भंडाराः १००.२२ रुपये.
 • बुलडाणाः १००.२९ रुपये.
 • गोंदियाः १००.९४ रुपये.
 • हिंगोलीः १००.६९ रुपये.
 • जळगावः १००.८६ रुपये.
 • जालनाः १००.९८ रुपये.
 • नंदूरबारः १००.४५ रुपये.
 • उस्मानाबादः १००.१५ रुपये.
 • रत्नागिरीः १००.५३ रुपये.
 • साताराः १००.१२ रुपये.
 • सोलापूरः १००.१० रुपये.
 • वर्धाः १०० रुपये.
 • वाशिमः १००.३४ रुपये.
 • ठाणेः १०० रुपये.
 • मुंबईः १००.०४ रुपये.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा