पेट्रोल-डिझेल सात दिवसांत तब्बल सहावेळा महागले, आठवडाभरात लिटरमागे ४ रुपये दरवाढ

1
43
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर जवळपास २६.४२ टक्क्यांनी घसरले असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ केली जात आहे. देशातील तेल कंपन्यांनी मागील सात दिवसांत तब्बल सहावेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. सोमवारीही पेट्रोल ३० पैश्यांनी तर डिझेल ३५ पैसे प्रतिलिटरने महागले. आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी चार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव १०३ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आले आहेत. फेब्रुवारीमध्ये हेच दर १४० डॉलर प्रतिबॅरल होते. असे असतानाही देशातील तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवत चालल्या आहेत. तेल कंपन्यांचे मनसुबे पाहता पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा हा फटका पुढील पंधरा दिवस सातत्याने बसण्याची शक्यता आहे.

नव्या दरवाढीमुळे आता दिल्लीत पेट्रोल ९९.४१ रुपये लिटर तर डिझेल ९०.७७ रुपये लिटर झाले आहे. चेन्नईत पेट्रोल १०५.१८ रुपये, तर डिझेल ९५.३३ रुपये लिटर, कोलकात्यात पेट्रोल १०८.८५ रुपये तर डिझेल ९३.९२ रुपये लिटर, मुंबईत पेट्रोल ११४.१९ रुपये तर डिझेल ९८.५० रुपये प्रतिलिटर झाले आहे.

चला उद्योजक बनाः  स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 गेल्या आठवडाभरात देशातील तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे. २२ मार्च रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आले. २३ मार्च रोजी पेट्रोल व डिझेलचे दरात प्रत्येकी ८० पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात आली. २५ आणि २६ मार्च रोजी पेट्रोल-डिझेल पुन्हा प्रत्येकी ८० पैसे लिटरने महाग करण्यात आले. २७ मार्च रोजी पेट्रोलच्या दरात ५० पैसे तर डिझेलच्या दरात ५५ पैसे प्रतिलिटर भाववाढ करण्यात आली. २८ मार्च रोजी पेट्रोल ३० पैसे तर डिझेल ३५ पैसे प्रतिलिटर महाग करण्यात आले आहे.

एक प्रतिक्रिया

  1. भारतात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे.ईतर प्रगत देशात नेत्रूत्व नसताना जनता शासनाच्या निर्णयाच्या विरोधात निदर्शने करतात . भारतात तरी परिस्थिती आजुन तरी नाही. आम्ही नेत्रूत्वा अभावी शासनाच्या एखाद्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरत नाही, आम्हाला एखादा नेता च लागतो, त्यामुळे पेट्रोल/डिझेल च्या किंमती वाढल्या काय आणि कमि झाल्या काय ,जनता शंड आहे काही फरक पडणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा