घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा ५० रुपयांनी महागले, गृहिणींचे बजेट कोलमडणार!

0
24
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटामुळे आधीच घायकुतीला आलेल्या सर्वसामान्यांवर पुन्हा घरगुती वापराच्या सिलिंडरच्या (एलपीजी) दरवाढीचा बोजा टाकण्यात आला आहे. देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमती तब्बल ५० रुपयांनी वाढवल्या असून ही दरवाढ तातडीने लागू करण्यात आली आहे.

 पेट्रोलियम कंपन्या दरमहिन्याच्या ३ तारखेला आढावा घेऊन गॅस सिलिंडरच्या किंमती कमी-अधिक करत असतात. मात्र यावेळी पेट्रोलियम कंपन्यांनी पंधरा दिवसांत आढावा घेऊन ही दरवाढ केली आहे. यापूर्वी १ डिसेंबर रोजी सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या.

आता नव्याने करण्यात आलेल्या दरवाढीनुसार १४.२ किलो वजनाच्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केली. ५ किलो वजनाच्या छोट्या गॅस सिलिंडरच्या किंमतीतही १८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर १९ किलो वजनाच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमती ३६ रुपये ५० पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत.

 प्रत्येक राज्यात वेगवेगळे कर असल्यामुळे सिलिंडरच्या दरातही फरक पडतो. नेहमी दरमहिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलिंडरच्या किंमतीचा आढावा घेतात. नव्याने करण्यात आलेल्या दरवाढीमुळे राज्यात आता घरगुती गॅससाठी ७१० रुपये मोजावे लागणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा