वर्षाअखेरीस येणार कोरोनावर इंजेक्शन आणि गोळी, घरीच गोळी घेऊन होणार रुग्णावर उपचार!

0
685

न्यूयॉर्कः कोरोना संसर्गापुढे संबंध जगच हतबल झालेले दिसत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना संसर्गावर प्रभावी प्रतिबंधक लस तयार करणाऱ्या फायझरकडून कोरोना संसर्ग झाल्यानंतर उपचार करण्यासाठी इंजेक्शन आणि गोळी तयार केली जात आहे. ही गोळी आणि इंजेक्शन या वर्षाअखेरीस उपलब्ध होतील, असे फायझरचे सीईओ अल्बर्ट बॉर्ला यांनी म्हटले आहे.

फायझरकडून सध्या कोरोनावरील दोन अँन्टीव्हायरलवर काम सुरू आहे. त्यापैकी एक औषध तोंडावाटे घेण्यात येणारे असून दुसरे औषध इंजेक्शनच्या माध्यमातून देता येणार आहे. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत अल्बर्ट बॉर्ला यांनीही महत्वाची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही औषधे घेण्यासाठी रुग्णालयात जाण्याची अजिबात गरज भासणार नाही. तर रुग्णांना ही औषधे घरीच येता येणार आहेत.

फायझरच्या नियोजनानुसार सर्वाकही सुरळित राहिले आणि औषधी नियामक प्राधिकरणाने मंजुरी दिली तर या वर्षाअखेरीस ही औषधे उपलब्ध होतील. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरियंटवरही औषधे प्रभावी असल्याचा दावाही बॉर्ला यांनी केला आहे.

 फायझर विकसित करत असलेली ही औषधे प्रोटीस अवरोधक (प्रोजिज इनहिबिटर) या श्रेणीतील आहेत. हे औषध मानवी शरीरात विषाणूच्या प्रतिकृती निर्माण करण्यास मज्जाव करणारे इन्झामिनप्रमाणे ते कार्य करते. प्रोटीज अवरोधकांचा वापर एचआयव्ही आणि हेपिटायटिस सीसारख्या विषाणूजन्य आजारांच्या उपचारातही केला जातो.

फायझरचे गोळीच्या स्वरुपात तोंडावाटे घ्यायचे हे औषध गेमचेंजर ठरणार  आहे. कोरोनाचा नव्याने संसर्ग झालेल्या व्यक्ती रुग्णालयात न जाता घरीच ही गोळी घेऊ शकणार आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला पायबंद घालण्यात जगाला मोठे यश येईल, असे आरोग्यतज्ज्ञांना वाटते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा