परळीत राडाः करूणा शर्मा यांच्या गाडीत पिस्टल आढळले, पोलिसांकडून चौकशी सुरू

0
4662

बीडः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीत येऊन पत्रकार परिषद घेण्याची घोषणा करणाऱ्या करूणा शर्मा आज परळीत दाखल झाल्या. वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी त्या गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी जोरदार रेटारेटीही झाली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी करूणा शर्मा यांना पोलिस ठाण्यात नेऊन बसवले असून त्यांच्या गाडीच्या झाडाझडतीत एक पिस्टल आढळून आले आहे. पोलिसांनी चौकशीसाठी ते ताब्यात घेतले आहे.

करूणा शर्मा यांनी गुरूवारी फेसबुक लाइव्हवर आपण परळीत येऊन रविवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्या आज परळीत दाखल झाल्या. इनोव्हा गाडीने परळीत दाखल झाल्यानंतर त्या वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी गेल्या. तेथे कार्यकर्त्यांनी विशेषतः महिला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी रेटारेटीही झाली.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

कार्यकर्त्यांची गर्दी आणि रेटारेटी पाहून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी करूणा शर्मा यांना पोलिस ठाण्यात नेले. तेथे पोलिसांनी त्यांच्या गाडीची झाडाझडती घेतली असता त्यांच्या गाडीत एक पिस्टल आढळून आले आहे. पोलिसांनी ते चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या करूणा शर्मा यांच्या गाडीत पिस्टल कसे? असा सवाल या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे. या पिस्टलचा त्यांच्याकडे परवाना आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा