‘विचार न करता घेतलेले निर्णय घातक म्हणून सोशल मीडिया सोडायला ८ दिवस वेळ घेतला का?’

0
100
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारपर्यंत सोशल मीडियापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेण्याचे संकेत स्वतःच ट्विट करून दिल्यानंतर देशाच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मोदींच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृह निर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. मोदींच्या या निर्णयाला नोटबंदीच्या निर्णयाशी सोडून आव्हाडांनी न विचार करता घेतलेले निर्णय घातक असतात याची कल्पना आल्यामुळे आठ दिवसांचा वेळ घेतला असेल का? असा टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियापासून अलिप्त राहण्याचा निर्णय येत्या रविवारपर्यंत घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ट्विटरवर नो मोदी नो ट्विटर हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. मोदींच्या निर्णयावर राजकारणातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृह निर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी यावरून मोदींवर निशाणा साधला आहे. ‘सोशल मीडिया बंद करायला आठ दिवसांचा वेळ घेतलाय पण नोटबंदी मात्र क्षणात केली होती. म्हणजेच न विचार करता घेतलेले निर्णय किती घातक असतात याची कल्पना आल्यामुळे त्यांनी आठ दिवसांचा वेळ घेतला असेल का?’, असा टोला ट्विट करून लगावला आहे.

 ढासळलेली अर्थव्यवस्था, दिल्ली व जेएनयू हिंसाचार, सीएए-एनआरसी कायदा, देशात द्वेषाचे वातावरण या गंभीर प्रश्नांमुळे संसदेच्या अधिवेशनात सरकार अडचणीत येणार हे कळताच पुडी सोडली सोशल मीडिया सोडण्याची आणि अपेक्षेप्रमाणे सर्वांचेच लक्ष तिकडे गेले, अशी टीका आशिष मेटे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा