पंतप्रधान मोदींकडे नागरित्वाचा दाखला आहे का?, पीएमओ म्हणते त्याची आवश्यकता नाही!

0
413
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः देशभरात सीएए आणि एनआरसीवरून आंदोलने सुरू आहेत. मोदी सरकार सीएएच्या मुद्यावर ठाम आहे. अशातच आरटीआय अंतर्गत पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) विचारलेल्या ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नागरित्वाचा दाखला आहे का?’ या प्रश्नाच्या उत्तरात मोदींना या दाखल्याची आवश्यकता नाही, असे उत्तर देण्यात आले आहे. त्यावरून आता जर पंतप्रधान मोदींनी त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्याची आवश्यकता नसेल तर ते इतरांनी का करावे?  असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

शुभांकर सरकार यांनी आरटीआय अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागरिकत्वाचा दाखला मागितला होता. त्याला उत्तर देताना पीएमओने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नागरिकत्वाचा दाखला असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ते जन्माने भारतीय नागरिक आहेत, असे स्पष्ट केले आहे. नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ३ नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माने भारतीय नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे नोंदणीकृत नागरिकत्व प्रमाणपत्र असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पीएमओने म्हटले आहे. पीएमओच्या या उत्तरानंतर प्रसिद्ध पत्रकार सीमा पाशा यांच्यासह अनेकांनी जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्याची गरज नसेल तर ते इतरांनी का करावे? असा सवाल केला आहे. मोदींकडेही त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्र नाही, याचा अर्थ मोदीजीही कागद दाखवणार नाहीत, अशी खोचक टिप्पणी अनेकांनी सोशल मीडियावर केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा