न्यूजटाऊन इफेक्ट: बीडच्या ‘सिंघम’ अधिकाऱ्याने ते वादग्रस्त छायाचित्र फेसबुक प्रोफाइलवरून हटवले!

0
104
हर्ष पोद्दार यांच्या याच छायाचित्रावरून वाद झाल्यानंतर त्यांनी ते फेसबुक प्रोफाईलवरून काढून टाकले आहे.

बीडः बीडच्या सिंघम पोलिस अधिकाऱ्याने एके-47 रायफल हातात घेऊन फेसबुक प्रोफाइल टाकलेले छायाचित्र अखेर काढून टाकले आहे. बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या फेसबुक प्रोफाइलवर साध्या वेशात हातात एक-47 रायफल असलेले छायाचित्र 8 ऑक्टोबर रोजी पोस्ट करण्यात आले होते. हे छायाचित्र व्हायरल झाले आणि सर्वसामान्य नागरिकांनी शस्त्रे हातात घेऊन सोशल मीडियावर छायाचित्रे टाकले तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करणाऱ्या पोलिसांनाही हे नियम लागू नाहीत का?, असे सवाल नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर विचारायला प्रारंभ केली होती.

विशेष म्हणजे लंडनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याकडून केली गेलेली अशी सशस्त्र हिरोगिरी पाहून अनेकांच्या भुवयाही उंचावल्या होत्या. न्यूजटाऊनने हर्ष पोद्दार यांच्या फेसबुक प्रोफाइलवरील या वादग्रस्त छायाचित्राची मूळ लिंकच दिली होती. आता ते छायाचित्र काढून टाकण्यात आल्यामुळे न्यूजटाऊनच्या बातमीत दिलेल्या लिंकच्या ठिकाणी ‘ This Facebook post is no longer available. It may have been removed, or the privacy settings of the post may have changed.’ असा फेसबुकचा संदेश दिसू लागला आहे. हर्ष पोद्दार यांनी जे छायाचित्र फेसबुक प्रोफाइलवर टाकले होते, ते दत्ता पडसलगीकर पोलिस महासंचलाक असताना जारी करण्यात आलेल्या निर्देशांची पायमल्ली करणारे होते. नेटकऱ्यांनी सवाल उपस्थित करताच हर्ष पोद्दार यांच्या फेसबुक प्रोफाइलवरून हे छायाचित्र हटवण्यात आले आहे.

आधीची बातमी : एके-47 सह बीडच्या पोलिस अधीक्षकांचा फोटो व्हायरल, सशस्त्र हिरोगिरीवर नेटकऱ्यांचे सवाल

छायाचित्र काढून टाकण्यात आल्याचा हाच तो फेसबुकचा मेसेज.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा