ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

0
115
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: राज्यातील ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ७ हजार १३० सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी ७ डिसेंबर २०२१ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३ पर्यंत असेल. 

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान २१ डिसेंबर २०२१ रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३.०० पर्यंतच असेल. या सर्व ठिकणी २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होईल, असे मदान यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा