पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

0
601
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः पोर्नोग्राफी चित्रपटाची निर्मिती करून ऍपच्या माध्यमातून प्रदर्शित केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला सोमवारी रात्री अटक केली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर पोलिसांनी नवी मुंबईच्या नेरूळ भागातून रेयान थारप नावाच्या आणखी एका व्यक्तीला आज अटक केली आहे. पॉर्न फिल्म निर्मितीत राज कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचे आतापर्यंत हाती आलेल्या पुराव्यावरून दिसते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

पॉर्न फिल्मचे शुटिंग केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकून पाच जणांना अटक केली होती तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्रींसह दोन तरूणींचा समावेश आहे. या दोन्ही तरूणी अभिनयाच्या क्षेत्रात नशीब अजमावण्यासाठी आल्या होत्या. मात्र त्या पॉर्न फिल्मची निर्मिती करणाऱ्या प्रॉडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने केलेल्या कारवाईत आतापर्यंत ११ जणांना अटक झाली आहे.

 काय आहे राज कुंद्राचे डर्टी पिक्चर’?: शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्याच्या नावाखाली एक टोळी पॉर्न फिल्मची निर्मिती करत होती आणि त्या पॉर्न फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करत होती. या संदर्भात पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि तिच्या आठ साथीदारांना अटक केली होती. पॉर्न फिल्म शूट झाले की भारतीय कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून ते ‘व्ही ट्रान्सफर’ या ऍपद्वारे परदेशात असलेल्या कंपनीला पाठवले जात असत.

या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी राज कुंद्रासोबत काम करणाऱ्या उमेश कामतला अटक केली. वियान इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय संचालक असलेला कामत हा राज कुंद्राच्या कार्यालयात बसून व्ही ट्रान्सफर ऍपद्वारे या पॉर्न फिल्मच्या फाईल्स परदेशात पाठवत होता. या कंपनीचा मालक राज कुंद्रा आहे. तन्वीर हाश्मी हा तरूण मुलामुलींना फूस लावून पॉर्न फिल्मच्या शूटिंगसाठी घेऊन येत असे. त्याने यातील सात ते आठ पॉर्न फिल्मचे दिग्दर्शन केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी त्यालाही सूरतमधून अटक केली आहे.

 राज कुंद्रा हा ब्रिटिश नागरिक आहे. मुंबई पोलिसांच्या पॉपर्टी सेलने राज कुंद्राला सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. सात ते आठ तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री त्याला अटक केली. राज कुंद्राच्या अटकेनंतर पोलिसांनी आज रेयानला अटक केली आहे. रेयॉनचे राज कुंद्रासोबत थेट संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांनीही आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा