महागाईचा झटकाः घरगुती सिलिंडर २४ रुपयांनी महागले, पेट्रोल-डिझेलच्या भावातही वाढ

0
82
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर देशातील तेल कंपन्यांनी आज सर्वसामान्यांना भाववाढीचा जोरदार झटका दिला. घरगुती स्वयंपाकाचा १४.२ किलो वजनाच्या सिलिंडरचे भाव २५ रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे या सिलिंडरचे भाव मुंबईत ६९४ रुपयांवरून ७१९ रुपयांवर तर औरंगाबादेत ७०३ रुपयांनी ७२८ रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी १५ डिसेंबर रोजी घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरच्या भावात ५० रुपयांची वाढ केली होती.

केंद्रीय अर्थसंकल्पात डिझेल आणि पेट्रोलवर कृषी अधिभार लावण्यात आला आहे. या अधिभारामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या भावातही वाढ केली आहे. डिझेलच्या किंमती प्रतिलिटर ३५ ते ३७ पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत तर पेट्रोलच्या किंमती ३५ ते २४ पैश्यांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमती आजवरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा