संजय राऊतांचा लेटरबॉम्बः महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी दबाव, तुरूंगात डांबण्याची धमकी

0
337
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे. सरकार पाडण्यास मदत न केल्यास एका माजी रेल्वे मंत्र्यांप्रमाणे तुरूंगात डांबून अनेक वर्षे सडवण्याची धमकी मला देण्यात आली आहेे. हे सरकार पाडण्यासाठी मदत करण्यास नकार दिल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माझ्यासह कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरूवात केली आहे. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी हे आता काही राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. त्यांना त्यांच्या बॉसकडून मला वठणीवर आणण्यास सांगण्यात आल्याची कबुलीच संबंधित अधिकाऱ्यांनी दिली असल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

 संजय राऊत यांनी सत्यमेव जयते अशी कॅप्शन देत राज्यसभेच्या सभापतींना लिहिलेल्या या खळबळजनक पत्राच्या प्रती ट्विट केल्या आहेत. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका व्हाव्यात यासाठी मदत करण्यास नकार दिल्यानंतर आपल्याला तुरूंगात पाठवण्याची धमकी देण्यात आली. जवळपास एक महिन्यापूर्वी काही लोकांनी माझ्याशी संपर्क सादला आणि महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी आम्हाला मदत करावी, असे त्यांनी सांगितले. सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असून त्यात मी महत्वाची भूमिका पार पाडावी. त्यामुळे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतील, असे ते लोक मला म्हणाले, असे राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशा कोणत्याही प्रकारच्या गुप्त अजेंड्याचा भाग होण्यास नकार दिल्यानंतर मला धमकावण्यात आले. तुम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागेल असे मला धमकावण्यात आले. एका माजी रेल्वेमंत्र्यांप्रमाणे तुम्हालाही अनेक वर्षे तुरूंगात काढावी लागू शकतात, असेही मला धमकावण्यात आले. माझ्याखेरीज महाराष्ट्रातील अन्य दोन ज्येष्ठ मंत्र्यांनाही पीएमएलए कायद्यांतंर्गत तुरूंगात टाकले जाईल. महाराष्ट्रातील सर्वच महत्वाचे नेते तुरूंगात गेले की महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागतील, असेही मला धमकावण्यात आल्याचे राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे.

 ईडी आणि अन्य यंत्रणांचे अधिकारी मी घरात आणि घराबाहेरही मोकळेपणाने बोलू नये म्हणून माझ्या या अधिकारावर थेट हल्ला करत आहेत. हा लोकशाहीवरील हल्ला आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या कटात सहभागी होण्यास मी नकार दिल्यामुळेच माझ्यासह माझ्याशी संबंधित लोकांना त्रास दिला जात आहे. सत्तेचा दुरूपयोग करून एका राज्यसभा सदस्याचा हा जो काही छळ होत आहे, त्याची नुसती दखल न घेता त्याबद्दल तुम्ही बोला आणि कारवाई करा, अशी विनंतीही राऊत यांनी या पत्रात केली आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

माझ्या मुलीचे लग्न २१ नोव्हेंबर २०२१ रोजी झाले. या लग्न सोहळ्याचे डेकोरेटर्स आणि अन्य व्हेंडर्सना ईडी व अन्य यंत्रणांचे अधिकारी समन्स बजावत आहेत. त्यांना मी ५० लाख रुपये रोखीने दिल्याचे त्यांच्याकडून वदवून घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. या लोकांनी तसे सांगण्यास नकार दिल्यानंतर ईडी व अन्य यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून त्यांचा छळ केला जात आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा