स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १८ जानेवारी रोजी मतदारांना सार्वजनिक सुटी जाहीर

0
20
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: राज्यातील ९५ नगरपंचायत, २ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत प्रत्येकी ७ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.

या ठिकाणी  १८ जानेवारी रोजी मतदान होत आहे. मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही सार्वजनिक सुटी निवडणुका असलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बॅंका इत्यादींना ही सार्वजनिक सुटी लागू राहणार आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील ९५ नगरपंचायतींकरिता तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी ७ पंचायत समित्‍या आणि सांगली-मिरज-कुपवाड या एका महानगरपालिकेच्या पोट निवडणुकीकरिता ही सार्वजनिक सुटी असेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा