ना गोळी झाडली, ना दगडफेक झाली; मग जीव वाचवून आल्याचे काय सांगता?, मोदींना सवाल

0
421
संग्रहित छायाचित्र.

चंदीगडः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात घडलेल्या सुरक्षेतील चुकीवरुन देशातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. या मुद्यावरून भाजपकडून काँग्रेसवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले जात आहेत. अशातच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी केलेले एक विधान चर्चेत आले आहे. पंजाबमधील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी ना गोळी झाडली, ना दगडफेक झाली, मग तुम्ही जीव वाचवून आल्याचे काय सांगत आहात? असा सवाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनाच थेट सवाल केला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ढिलाई समोर आली आहे. बुधवारी हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर प्रधानमंत्र्यांचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला होता. तेव्हा काही आंदोलकांनी प्रधानमंत्र्यांचा ताफा अडवल्याचे दिसून आले. प्रधानमंत्री या उड्डाणपुलावर सुमारे २० मिनिटे अडकले होते. तेथून भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर ‘तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा, मी जिंवत परतलोय,’ असे मोदी पंजाब सरकारच्या मंत्र्याला म्हणाले होते. त्यावरूनच पंजाबचे मुख्यमत्री चन्नी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

हेही वाचाः  पुरूषोत्तम ‘अर्थ’शास्त्रः ना पदासाठी अर्ज, ना मुलाखत पत्र; तरीही देशमुखांची अधिव्याख्यातापदी नियुक्ती!

पंजाबच्या टांडा भागात झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत बोलताना चन्नी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील चुकीच्या मुद्यावर भाष्य केले. ‘तुम्हाला कोणताही धोका नव्हता. तुमच्या जवळपास कोणीही आले नाही. कुठली नारेबाजी झाली नाही. कोणती दगडफेक झआली नाही. कोणतीही गोळी झाडली गेली नाही. मग तुम्ही जीव वाचवून आल्याचे काय सांगत आहात?’ असा सवाल चन्नी यांनी केला आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

 चन्नी यांचे हे विधान सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरले आहे. त्यावरून वाद होण्याची शक्यता असतानाच त्यांनी केलेले एक ट्विटही चर्चेत आले आहे. त्यांनी कुणाचेही नाव न घेता सरदार वल्लभभाई पटेल यांचे एक विधान आपल्या ट्विटमध्ये उद्धृत केले आहे. ‘जिसको कर्तव्य से ज्यादा जान की फक्र हो, उसे भारत जैसे देश में बडी जिम्मेदारी नहीं लेनी चाहिए- सरदार वल्लभभाई पटेल’, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. चन्नी यांनी कुणाचेही नाव न घेता हे ट्विट केलेले असले तरी सध्याचे तापलेले वातावरण पाहता त्यांनी थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनाच निशाणा केल्याचा अर्थ त्यातून काढला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा