आरूसा आलम यांनी सोडले मौन, कॅप्टन अमरिंदर सिंगांसोबतच्या नात्याचा केला खुलासा; म्हणाल्या…

0
447
संग्रहित छायाचित्र.

इस्लामाबादः पंजाबच्या राजकारणात ज्यांच्या अचानक ‘एन्ट्री’मुळे राजकीय घमासान सुरू झाले आहे, त्या पाकिस्तानी पत्रकार आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मैत्रीण आरूसा आलम यांनी अखेर मौन सोडले असून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी नात्याचा खुलासा केला आहे.

माझे कॅप्टन साहेबांशी अतिशय माणुसकीचे नाते आहे. मी त्यांची खूप चांगली मैत्रीण आहे, याचा मला खूप अभिमान आहे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. आमच्या नात्यावर टीका करणारे आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे लोक नैतिकतेच्या बाबतीत सिंग यांच्या जवळही जाऊ शकत नाहीत, असे आरूसा आलम यांनी म्हटले आहे.

 चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

आरूसा आलम यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना निर्लज्ज संबोधले आहे. त्यांना रॉने आयएसआयशी संबंध असल्याच्या आरोपातूनही मुक्त केले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मी आणि पाकिस्तानमधील माझ्या कामाची रॉने परस्पर गुप्तचर संस्थांमार्फत कसून तपासणी केली आहे. सर्व तपासणीनंतर मला रॉ आणि इतर आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांनी सर्व आरोपांतून मुक्त केले आहे, असा दावा आरूसा आलम यांनी फ्री प्रेस जर्नलशी बोलताना केला आहे.

हेही वाचाः आरूसा आलम यांच्यावरून राजकीय घमासान, कोण आहे ही कॅप्टन सिंगांची पाकिस्तानी मैत्रीण?

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नवीन पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आणि भाजपशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न सुरू केल्यानंतर आरूसा आलम आणि त्यांच्यातील मैत्रीचा मुद्दा काँग्रेस नेत्यांनी उचलून धरला आहे. कॅप्टन सिंग यांची पाकिस्तानी मैत्रीण आरूसा आलम यांचे आयएसआयशी संबंध असल्याचा दावा करत पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरूसा आलम यांनी हा खुलासा केला आहे.

माझ्यावर झालेल्या आरोपांबद्दल न्याय मिळवण्यासाठी मी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ शकते. ज्यांनी माझे फोटो आणि माहिती प्रसिद्ध केली, अशा सर्व राजकारणी आणि मीडिया हाऊसच्या विरोधात मानहानीच्या याचिका दाखल करण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि मानवी हक्क आयोगामार्फत मी त्यांच्यावर बंदी घालणार, असा इशाराही आरूसा आलम यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा