रेल्वेच्या तत्काळ आरक्षण कोट्यातील तिकिटांच्या बुकिंग रॅकेटप्रकरणी औरंगाबादेतून एकास उचलले

0
110
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः रेल्वेची वेबसाइट हॅक करून तत्काळ तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटप्रकरणी औरंगाबादच्या बुढ्ढीलेन भागातून रेल्वे सुरक्षा बलाने आज एकाला अटक केली. सोहेल अहमद असे त्याचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील गौडा येथील रहिवासी आहे. गेल्या सहा वर्षांपासून तो औरंगाबादेत वास्तव्यास असून बुढ्ढीलेन भागात तो टेलरिंगचे काम करत होता.

 रेल्वेची बेवसाइट हॅक करून रेल्वेच्या तत्काळ आरक्षित तिकिटांचे काही मिनिटांत 85 टक्के बुकिंग करणारे रॅकेट दुबईतील हमीद असर्फ चालवत होता. एका सॉफ्टवेअरच्या साह्याने हे रॅकेट चालवले जात होते. या सॉफ्टवेअरद्वारे रेल्वेची बेवसाइट हॅक करून जनरेट झालेली लिंक हमीद दुबईतून भारतातील त्याच्या संपर्कातील लोकांना पाठवत होता. हमीदकडे भारतातील ज्या 93 लोकांचे मोबाइल क्रमांक सापडले, त्यात सोहेल अहमद याचाही समावेश आहे. सोहेल अहमदकडे 30 मोबाइल सीमकार्ड सापडले आहेत. दुबईतील हमीदच्या साह्याने भारतात हे रॅकेट चालवणार्‍या टोळीच्या म्होरक्यास आसामच्या गुवाहटीमधून उचलल्यानंतर काल मध्यरात्रीपासून देशभरात 8 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. याच मोहिमेअंतर्गत औरंगाबादेतून सोहेल अहमदला उचलण्यात आले आहे.

 तुमची बेवसाइट हॅक होणार नाही अशी व्यवस्था कराः रेल्वेच्या तत्काळ  कोट्यातील आरक्षित तिकिटे बुकिंगचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीच्या म्होरक्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या महासंचालकांना टेक्स्ट मेसेज करून डोळ्यात अंजन घातले आहे. माझ्यावर तुम्ही कारवाई केली तर माझे लग्न कसे होईल, त्यापेक्षा रेल्वेची वेबसाइट हॅकच होणार नाही, अशी व्यवस्था तुम्ही करायला हवी, असे या टेक्स्ट मॅसेजमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा