राज ठाकरे जाणार आक्रमक हिंदुत्वाच्या वाटेने, भाजपचा सीएएसीचा अजेंडाही राबवण्याची शक्यता

0
120
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः गेली काही वर्षे मरगळ आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ( मनसे) नवसंजीवनी देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे आता आक्रमक हिंदुत्वाच्या वाटेने जाण्याच्या तयारीत असून येत्या 23 जानेवारीला होऊ घालेल्या पक्षाच्या मेळाव्यात ते आक्रमक हिंदुत्वाच्या वाटेने जाण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. पक्षाच्या झेंड्यांच्या रंग बदलण्याबरोबरच राज ठाकरेंची मनसे राजकीय रंगही बदलण्याची शक्यता असून केंद्रातील मोदी सरकारचा एनआरसी आणि सीसीएच्या अजेंड्यासाठीही ते आग्रही भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

23 जानेेवारीला होणार्‍या मनसेच्या मेळावा होत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका करणारे राज ठाकरे आता राजकीय रंग बदलून भाजपशी हातमिळवणी करणार असल्याचीही चर्चा आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज त्याच पार्श्‍वभूमीवर भेट झाल्याचेही समजते. दोघांची ही भेट सुमारे तासभर चाललल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि सत्ताही ताब्यात घेतली. मात्र महाविकास आघाडीच्या प्रयोगात शिवसेनेचे आक्रमक हिंदुत्व मागे पडल्याची टीका होऊ लागली आहे. शिवसेनेपासून दुरावलेला कट्टर हिंदुत्ववादी मतदार आपल्या गळाला लावण्यासाठी राज ठाकरेंची मनसे आक्रमक हिंदुत्वाच्या मार्गाने जाण्याची शक्यता आहे. तुमच्या आजूबाजूला कोणी बांग्लादेशी, पाकिस्तानी रहात असेल तर त्याला शोधून काढा आणि त्याला भारतातून हुसकावून लावण्यासाठी आंदोलन करा, असा ठराव मनसेच्या 23 जानेवारीच्या मेळाव्यात घेतला जाण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या पुढाकारातून मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीएएची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही रहाण्याचा आदेश राज ठाकरे मनसैनिकांना देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सीएए लागू होणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले तर मनसैनिक विरुद्ध शिवसैनिक असा संघर्षही आगामी काळात निर्माण होण्याची शक्यता आहे.

झेंड्यात राजमुद्रेवर संभाजी ब्रिगेडचा आक्षेपः मनसे झेड्यांचा रंग बदलून तो भगवा करण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच या भगव्या झेंड्यात राजमुद्रा असण्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. मनसेने आपल्या राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करून नये, अन्यथा आम्ही आमच्या स्टाइने आंदोलन करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे. राजमुद्रा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रतीक आहे. ही राजमुद्रा महाराजांची प्रशासकीय बाब आहे. तिचा राजकारणासाठी वापर केल्यास आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू, असे शिंदे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा