महाराष्ट्रातही ऑपरेशन कमळ म्हणणारे आज कुठल्या बिळात लपले?: काँग्रेसचा भाजपला टोला

1
499
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राजस्थानमध्ये सुरू असलेला राजकीय तिढा आज सुटल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राजस्थाननंतर आता भाजप महाराष्ट्रातही ऑपरेशन कमळ राबवणार असल्याची चर्चा सचिन पायलटांच्या बंडापासूनच सुरू झाली होती. त्याचवरून काँग्रेस नेते भाई जगताप यांनी भाजपला टोला हाणला आहे. राजस्थाननंतर महाराष्ट्रातही ऑपरेशन कमळ म्हणणारे आता कुठल्या बिळात लपले?, असा टोमणा भाई जगताप यांनी भाजपला हाणला आहे.

सचिन पायलट यांनी सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतल्यानंतर आज दिलजमाई घडून आली. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राजस्थानमधील तिढ्यातून मार्ग निघाल्याची घोषणा केली. राजस्थानातील राजकीय घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर आठ कोटी प्रदेशवासियांना शुभेच्छा. राहुल गांधी यांची दूरदृष्टी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा संकल्प व प्रियंका गांधी यांचे सहकार्य फलद्रुप झाले आहे. अशोक गहलोत यांची परिपक्वता आणि सचिन पायलट यांचा विश्वास आणि निष्ठेने हे शक्य झाले, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः राजस्थानचा तिढा सुटलाः सचिन पायलट- अशोक गहलोतांची दिलजमाई, मराठी चेहरा ठरला दुवा!

 याचवरून भाई जगताप यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना टोला हाणला आहे. राजस्थाननंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ असे म्हणणारे कुठे पळाले, बघा रे! कोणत्या बिळात लपले आज?, असे ट्विट भाई जगताप यांनी केले आहे.

राजस्थानमध्ये झालेल्या दिलजमाईवरून काँग्रेस नेते भाजपला चांगलेच फैलावर घेत आहेत. राजस्थानमध्ये वाचलेले सुटकेस आता कोणत्या राज्यात मिळतील?, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते पंकज पुनिया यांनी केली आहे. तर राजस्थानमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्याचे श्रेय घेता येत नाही म्हणून बसप प्रमुख मायावती यांना आज खूपच दुःख झाले असेल, असा टोमणा काँग्रेस प्रवक्ते डॉ. उदित राज यांनी हाणला आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा