लातूरच्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई

0
254
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः अपुरे भांडवल आणि व्यवसाय चालू ठेवण्यास असमर्थता या कारणांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लातूरच्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेचे लातूर जिल्ह्यातील निलंग्यात मुख्यालय आहे. मागील अनेक महिन्यांपासून या बँकेची आर्थिक परिस्थिती बेताची बनली होती. त्यामुळे बँकेला व्यवसाय सुरू ठेवणेही कठीण झाले होते. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने या बँकेचा परवाना रद्द केला. आणि बँकेवर लिक्विडेटर नेमून बँक गुंडाळण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश सहकार आयुक्तांना दिले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगीच रद्द केल्यामुळे आता डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेला ठेवी स्वीकारणे, कर्ज वाटप करणे किंवा बँकिंग व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार ही बँक बंद करण्याची कायदेशीर प्रक्रियाही लवकरच पूर्ण केली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा