पुन्हा एकदा नोटबंदीः मार्चपासून १००, १० आणि ५ रुपयाच्या जुन्या नोटा होणार चलनातून बाद!

0
2395
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः येत्या मार्च महिन्यापासून १०० रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद होतील. त्याबरोबरच १० रुपये आणि ५ रुपयाच्या जुन्या नोटाही चलनातून बाद होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) महाव्यवस्थापक बी.एम. महेश यांनीही माहिती दिली. म्हणजेच १ एप्रिलपासून १०० रुपयाच्या फक्त नवीन नोटाच वापरल्या जाणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता अचानक नोटबंदी जाहीर करत ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. मोदी यांच्या नोटबंदीला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यात आता ही नवीन नोटबंदी येणार आहे.

हेही वाचाः शेतकरी आंदोलनातील चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा कट

जिल्हास्तरीय सुरक्षा आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हा पंचायत नेत्रावती सभागृहात नुकतीच झाली. या बैठकीत बोलताना महेश यांनी ही माहिती दिली. सध्या चलनात असलेल्या १०० रुपयाच्या बहुतेक नोटा बनावट असल्याने जुन्या १०० रुपयांच्या नोटा मागे घेण्यात येतील. गेल्या सहा महिन्यांपासून आरबीआयने या नोटांची छपाई बंद केली आहे. या निर्णयामुळे लोकांनी घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. हा निर्णय फक्त नवीन नोटा चलनात आणण्यासाठी घेण्यात आला आहे, असे महेश म्हणाले.

हेही वाचाः आता रेणू शर्मा म्हणतेः माझ्याकडे धनंजय मुंडेंचे ना आक्षेपार्ह फोटो, ना व्हिडीओ!

रिझर्व्ह बँकेकडून बँकांना जुन्या नोटा परत घेण्याची मोहीम आखण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे बँकांत जमा झालेल्या १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा पुन्हा चलनात येणार नाहीत, असे महेश म्हणाले. आरबीआयने दोन वर्षांपूर्वी १०० रुपयाची नवीन नोट चलनात आणली होती. ही नोट चलनात आणल्यानंतरही आधीच्या १०० रुपयाच्या सर्व जुन्या नोटा चलनात कायम राहतील, असे आरबीआयने स्पष्ट केले होते. नवीन शंभर रुपयाची नोट फिक्कट जांभळ्या रंगाची आहे. या नोटेमध्ये अशोक स्तंभ आणि नोटेच्या मागच्या बाजूला राणीच्या विहिरीचे चित्र आहे.

हेही वाचाः अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनाही परदेशात उच्च शिक्षणासाठी दिली जाणार शिष्यवृत्ती

दहा रुपयाचे नाणे झाले ओझेः १० रुपयाचे नाणे व्यापारी आणि उद्योजकांकडून अद्यापही स्वीकारले गेले नाही. १० रुपयांचे नाणे आणून १५ वर्षे झाली तरीही व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वीकार न करणे ही बँका आणि रिझर्व्ह बँकेसाठी मोठी समस्या आहे. १० रुपयाचे नाणे बँकांसाठी मोठे ओझे झाले आहे, असेही महेश म्हणाले. या नाण्याच्या वैधतेबाबत अफवा पसरत असून लोकांना याबद्दल जागरूक करण्याची गरज आहे, असेही महेश म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा