फडणवीसांना आणखी एक झटकाः मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचे काम पीडब्लूडीकडे!

0
87
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचे काम केंद्र सरकारच्या अखत्यारितील एनबीसीसी म्हणजे नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेडला देण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने रद्द केला असून हे काम आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ( पीडब्लूडी) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत  विधानभवनात मंगळवारी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, ऊर्जा मंत्री नितिन राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) ए.बी. गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एनबीसीसी यांच्याऐवजी पुढील काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यास तसेच या कामाच्या खर्चास तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यास उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली. नवीन आमदार निवासाचे काम तातडीने सुरू करून जलदगतीने पूर्ण करावे, अशा सूचना सभापती व अध्यक्षांनी यावेळी केल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा