तक्रारींनंतर दहा दिवसांत खड्डे बुजवले नाही तर गुन्हा नोंदवा : हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

0
79
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद: रस्त्यातील खड्ड्यांची तक्रार त्या शहरातील सर्वसामान्य नागरिकही करू शकतो. त्याने केलेल्या तक्रारीनंतर १० दिवसात खड्डा बुजवला नाही तर पोलीस विभागाने तीन दिवसात चौकशी करून गुन्हा दाखल करावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. झेड. ए. हक आणि  न्या. एस. एम. गव्हाणे यांनी दिले. ऍड. रुपेश जैस्वाल यांनी पार्टी पर्सन दाखल केलेल्या जनहित याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने हा आदेश दिला. अशाच एका प्रकरणात नागपूर खंडपीठाने सुमोटो दाखल करून घेतल्यानंतर असाच निर्णय दिला होता.

रस्त्यांवरील खड्ड्यासंबंधी यापूर्वी महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांच्या वाहतूक शाखेचे सहायक आयुक्तांना शपथपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. यात महानगरपालिकेने नागरिकांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरू केलयाचे सांगितले. तसेच हेल्पलाईन नंबर 9607933541 हा क्रमांक दिला. तर वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त दिनेश कोल्हे यांनी नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयीची माहिती शपथपत्राद्वारे खंडपीठात सादर केली. त्यामध्ये दोन ई-मेल तसेच दोन व्हॉटसअप‍ मोबाईल क्रमांकही (8396022222/ 7030342222) दिले आहेत. याशिवाय ट्विटर खाते क्रमांकही दिलेला आहे.

या खात्यावर कुठलाही नागरिक रस्त्यावरील खड्ड्याची तक्रार संबंधित विभागाकडे (महानगरपालिका, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अथवा सार्वजनिक बांधकाम) देऊ शकतो. संबंधित नागरिकाच्या  तक्रारीची नोंद घेऊन अधिकार क्षेत्रातील विभागाने दहा दिवसात खड्डा बुजवला नाही तर त्याची पोलीस विभागाने चौकशी करून गुन्हा करावा, असे आदेश देत खंडपीठाने तक्रार नोंदवण्याच्या माध्यमांची जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवावी, अ्सेही म्हटले आहे.याप्रकरणात ऍड. रुपेश जैस्वाल यांनी पार्टी पर्सन म्हणून, सरकारी वकील एस. बी. यावलकर, महाराष्ट्र रस्ते विकाम महामंडळाकडून ऍड. श्रीकांत अदवंत तर महानगरपालिकेकडून ऍड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा