अतिवृष्टीग्रस्तांना दिलासाः वाढीव दराने मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

0
111
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.

राज्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची रक्कम वाढवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तथापि, अद्यापही केंद्र शासनाने २०१५ नंतर नुकसानभरपाईच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने केंद्राच्या दरापेक्षा जास्तीच्या दराने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम २०१९ च्या महापूरात देण्यात आलेल्या दराप्रमाणे आहे. त्यामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.

कसा असेल वाढीव मदतीचा दर?: राज्यात २०१९ मध्ये आलेल्या महापुराने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी अतिवृष्टीग्रस्तांना ५ हजार रुपे रोखीने आणि १० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय झाला होता. छोट्या दुकानदारांना ५० हजार रुपये, जनावरांचे नुकसान झालेल्यांना २० हजार रुपये असा मदतीचा दर ठेवण्यात आला होता. घरांच्या पडझडीसाठीही तेव्हा जास्त दराने मदत देण्यात आली होती. आता याच वाढीव दराने यंदाच्याही अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा