कुतुब मीनारमधील दोन गणेशमूर्ती हटवा, भाजप नेत्याच्या अध्यक्षतेखालील ‘एनएमए’चे आदेश

0
146
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः ऐतिहासिक कुतुब मीनार परिसरात असलेल्या दोन गणेशमूर्ती हटवण्याचे निर्देश राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने (एनएमए) भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला (एएसआय) दिले आहेत. कुतुब मीनार परिसरात गणेश मूर्तींची स्थापना अपमानजनक आहे. या मूर्ती येथून हटवून त्या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये नेण्यात याव्यात. राष्ट्रीय संग्रहालयात या मूर्तींना प्राचीन वस्तू ठेवण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी ‘सन्मानजनक’ स्थान देण्यात यावे, असेही एनएमएने म्हटले आहे.

एनएमए आणि एएसआय ही दोन्ही प्राधिकरणे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात. २०११ मध्ये राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची (एनएमए) स्थापना करण्यात आली होती. स्मारके, स्थळे आणि त्याच्या आसपासच्या परिसराची सुरक्षा आणि संरक्षण हा एनएमएच्या स्थापनेमागचा मूळ हेतू आहे.

भाजपचे नेते आणि माजी राज्यसभा सदस्य तरूण विजय हे एनएमएचे प्रमुख आहेत. त्यांनी एएसआयला पत्र पाठवण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मी अनेकवेळा कुतुब मीनारचा दौरा केला. तेथे मूर्ती असणे अपमानजनक असल्याचे माझ्या लक्षात आले. तेथे मशीद आहे. लोक मूर्त्यांजवळच चप्पल वगैरे सोडतात, असे तरूण विजय म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचाः ‘बामु’च्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशींवर कारवाई करायची कुणी? सहसंचालकाकडून कर्तव्यात कसूर

स्वातंत्र्यानंतर आम्ही इंडिया गेटहून ब्रिटीश राजे आणि राण्यांच्या मूर्त्या काढून टाकल्या आहेत. वसाहतवादाच्या खानाखुणा मिटवून टाकण्यासाठी रस्त्यांची नावेही बदलली आहेत. मुगल शासकांच्या काळात ज्याचा सामना हिंदूने केला होता, तो सांस्कृतिक नरसंहार पटलून टाकण्यासाठी आता आम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे, असे तरूण विजय म्हणाले.

 कुतुब मीनार एक आंतरराष्ट्रीय वारसा स्थळ आहे. १९९३ मध्ये युनेस्कोने कुतुब मीनारला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा घोषित केला होता. कुतुब मीनार हे १२ शतकातील स्मारक आहे. कुतुब मीनारमध्ये असलेल्या दोन गणेश मूर्तींपैकी एक गणेशमूर्तीया परिसरात असलेल्या कुव्वत उल इस्लाम मशिदीच्या दक्षिणेकडील भिंतीचा भाग आहे. लोखंडी पिंजऱ्यात बंद असलेली दुसरी मूर्ती खाली ठेवण्यात आलेली आहे. ही गणेश मूर्तीही त्याच मशिदीचा भाग आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 कुतुब मीनारमध्ये ज्या पद्धतीने या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत, ती भारतासाठी अपमानास्पद बाब आहे. त्यात सुधारणेची गरज आहे, असे तरूण विजय म्हणाले. २७ जैन आणि हिंदू मंदिरे उद्धवस्त करण्यात आल्यानंतर कुतुब मीनारमध्ये या दोन गणेशमूर्ती लावण्यात आल्या होत्या, असेही ते म्हणाले. कुतुब मीनारमध्ये असलेल्या या दोन गणेशमूर्तींपैकी एक गणेशमूर्ती ‘उल्टा गणेश’ तर दुसरी गणेशमूर्ती ‘ पिंजऱ्यातील गणेश’ म्हणून ओळखल्या जातात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा