प्रजासत्ताकदिनाच्या मार्चिंग परेडमध्ये महाराष्ट्राच्या एनसीसी तुकडीत औरंगाबादचा सिद्धेश जाधव

0
311

नवी दिल्ली/औरंगाबादः ७२ व्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणाऱ्या एनसीसीच्या मार्चिंग परेडमध्ये महाराष्ट्राच्या तुकडीत औरंगाबादचा एनसीसी सिनियर अंडर ऑफिसर सिद्धेश अप्पासाहेब जाधव याची निवड झाली आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात साजऱ्या होत असलेल्या प्रजासत्ताकदिनाच्या मार्चिंग परेडमध्ये निवड झाल्याबद्दल सिद्धेशचे अभिनंदन होत आहे.

 सिद्धेश जाधव हा देवगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच एनसीसी यूनिटचा सिनियर अंडर ऑफिसर असून प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणाऱ्या मार्चिंग परेडच्या सरावासाठी गेल्या दोन महिन्यांपासून तो नवी दिल्लीत आहे. अत्यंत कठोर परिश्रम घेत जिद्द चिकाटी बाळगत विविध स्पर्धा पार पाडत सिद्धेशने यशाचे हे शिखर गाठले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सिद्धेश जाधवला प्रजासत्ताक दिनाच्या मार्चिंग परेडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, ५१ महाराष्ट्र बटालियनचे  कमांडिंग ऑफिसर कर्नल रविंद्र जैस्वाल, एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ. परशुराम बाचेवाड आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मार्चिंग तुकडी/ चित्ररथाला करा ऑनलाइन मतदानः यावर्षी डिजिटल नोंदणीव्दारे आपल्या आवडत्या चित्ररथाला आणि मार्चिंग तुकडीला मत देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात बऱ्याच अभिनव बाबींचा समावेश करण्यात आलेला. याचाच एक भाग म्हणून आणि सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी बघता प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था कमी करण्यात आली आहे. मात्र, ऑनलाइन माध्यमातून थेट प्रक्षेपण बघता येईल. थेट प्रक्षेपण बघण्यासाठी MyGov पोर्टलवर (https://www.mygov.in/rd2022/) नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. यासह प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या चित्ररथाला आणि मार्चिंग तुकडीला मतदान करता येईल, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा