सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांचे निधन

0
174
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बॅ.बलभीमराव नरसिंगराव उर्फ बी.एन.देशमुख काटीकर (८५वर्षे) यांचे काल मध्यरात्री निधन झाले.

तुळजापूर तालुक्यातील काटरी येथील बँ. बलभिमराव देशमुख तथा तात्यासाहेब यांचे १९६५ ला एलएलबीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लंडन येथे जाऊन डिप्लोमा इन इंटरनॅशनल लॉचे शिक्षण पूर्ण केले. भारतात परतल्यानंतर त्यांनी मुंबईत बॅ. रामराव आदिक यांच्याकडे ज्युनिअर म्हणून काम केले. हे का करत असताना त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीत झोकून दिले. शेकापचे नेते माजी खासदार उध्दवराव पाटील यांचे ते भाचे होते. याच दरम्यान १९७८-१९८४ मध्ये बॅ. देशमुख हे विधानपरिषदचे आमदार झाले.

औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी सुरु करण्यात आलेल्या चळवळी ते अग्रभागी होते. औरंगाबादला खंडपीठाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी मुंबईची वकिली सोडून औरंगाबादला आले आणि ते खंडपीठात प्रॅक्टिस करू लागले. १९८६ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी निवड झाली. १९८७ मध्ये ते कायम झाले. त्यांनी आपल्या न्यायमूर्ती म्हणून सेवेच्या कळात शेतकरी आणि विद्यार्थांच्या हिताचे निर्णय दिले.

साखर कारखान्यांची झोनबंदी उठवण्याचा त्यांचा महत्वपूर्ण निर्णय होता. या निर्णयामुळे शेतकरी आपल्या ऊसाला भाव मिळेल त्या ठिकाणी विकू लागला होता. न्या. बी.एन. देशमुख १९९७ सेवानिवृत्त झाले तेव्हापासून ते औरंगाबादेतच वास्तव्यास होते. निवृत्ती नंतर त्यांनी शासनाचे कोणतेही पद स्वीकारले नाही. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, दोन नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा