मराठवाडयात सरकारी कार्यालयांकडे महावितरणची २ हजार १५१ कोटी रूपयांची थकबाकी

0
108
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद महावितरणला वीज विकत घेवून ग्राहकांना वीज पुरवठा करावा लागतो. विकलेल्या विजेचे पैसे वसूल होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. मराठवाडयात औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील सार्वजनिक पाणी पुरवठा, पथदिवे व सरकारी कार्यालयाच्या ४३, १३८ वीज ग्राहकांकडे २, १५१.१७ कोटी रूपयांची थकबाकी आहे. कोरोनाच्या नियमाचे पालन करून वीज पुरवठा खंडित न करता आमदार, पालकमंत्री यांची मदत घेवून थकबाकी वसूल करण्यात येत आहे. 

सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणकडून कोणत्याही ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत नाही. वीज ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी विनंती, सूचना, पत्रव्यवहार, वॉटसअपद्वारे एसएमएस संदेश मा. उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता व  सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात येत आहेत.

औरंगाबाद परिमंडलातील सर्व शासकीय कार्यालय, सार्वजनिक पाणी पुरवठा व पथदिव्यांच्या ११ हजार ७१२ वीज ग्राहकांकडे ४३१.३२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. लातूर परिमंडलातील सर्व शासकीय कार्यालय, सार्वजनिक पाणी पुरवठा व पथदिव्यांच्या १७ हजार ५१५ वीज ग्राहकांकडे १०५२.९९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. नांदेड परिमंडलातील सर्व शासकीय कार्यालय, सार्वजनिक पाणी पुरवठा व पथदिव्यांच्या १३,९११ वीज ग्राहकांकडे ६६६.८६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. असे मराठवाडयात औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील सार्वजनिक पाणी पुरवठा, पथदिवे व सरकारी कार्यालयाकडे ४३,१३८ वीज ग्राहकांकडे २,१५१.१७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

नगरपालिका, महानगरपालिका आणि शासकीय कार्यालय यांच्याकडे असलेली वीज बिलाची थकबाकी वसूल करण्याला प्राधान्य घावे. तसेच वीज बिलाची थकबाकी  वसूल करण्यासाठी त्या भागातील आमदार- पालकमंत्री याची मदत घेण्याची सूचना उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. 

परिमंडल     वीज ग्राहक        थकबाकी (कोटी रुपये)

  • औरंगाबाद    ११,७१२           ४३१.३२       
  • लातूर       १७,५१५          १०५२.९९
  • नांदेड       १३,९११           ६६६.८६
  • एकूण       ४३,१३८         २,१५१.१७

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा