राज्यात कोरोना काळात तब्बल २९ कोटी ६६ लाखांची दंड वसुली

0
25
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई: लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोरोना संदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख ७५ हजार गुन्हे,तसेच  १ हजार ३४७ वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले तर २९ कोटी  ६६ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात २२ मार्च ते ३ ऑक्टोबरपर्यंत कलम १८८ नुसार २,७५,९९० गुन्हे नोंद झाले असून ३९,०३९ व्यक्तींना अटक करण्यात आली. ९६,५४१ वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यांसाठी २९ कोटी ६६ लाख १८हजार ५३२ रुपये दंड आकारण्यात आला.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

पोलिसांवर तब्बल ३६९ हल्लेः कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३६९ घटना घडल्या. त्यात ८९८ व्यक्तींना, ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा