जास्त शिक्षण आणि संपत्तीमुळे गर्विष्ठपणा येतो आणि घटस्फोट होतातः मोहन भागवत

0
204
छायाचित्र सौजन्यः विकीपिडीया

अहमदाबादः शिक्षण आणि संपत्तीमुळे माणसांमध्ये गर्व येतो आणि त्यामुळेच अशा कुटुंबामध्ये घटस्फोटांचे प्रमाण जास्त असते, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

अहमदाबादेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसाठी आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे विधान केले आहे. सध्या घटस्फोटांचे प्रमाण खूपच वाढले आहे. क्षुल्लक कारणावरूनही लोक भांडतात. सधन आणि सुशिक्षित कुटुंबांमध्येच अशा घटस्फोटांचे प्रमाण जास्त आहे. जास्त शिक्षण आणि संपत्तीमुळे माणसांमध्ये गर्व येतो. समाजही एका कुटुंबासारखाच असून तो अशा गर्विष्ठ व्यक्तींमध्ये दुभंगला जातो, असे भागवत म्हणाले. भारताला हिंदू समाजाशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. हिंदू समाज सद्गुणी आणि संघटित राहिला पाहिजे. मी हिंदू आहे. मी सर्व धर्मांशी संबंधित श्रद्धास्थानांचा आदर करतो. परंतु माझ्या श्रद्धास्थानांबाबत मी ठाम आहे, असेही भागवत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा