आरएसएस ही दहशतवादी संघटना, मोहन भागवतांच्या नेतृत्वात मी बॉम्बस्फोट घडवले : संघाच्या माजी प्रचारकाचा खळबळजनक दावा

1
2873
संग्रहित छायाचित्र.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही दहशतवादी संघटना आहे. आरएसएसचे तत्कालीन सहकार्यवाह मोहन भागवत यांच्या नेतृत्वात मी स्वतः अनेक बॉम्बस्फोटात सहभागी होतो. देशभक्तीच्या नावावर आरएसएसच्या सांगण्यावरून माझ्या हातून अनेकांचे बळी गेले आहेत, असा खळबळजनक दावा आरएसएसचे आंध्र प्रदेशातील माजी प्रचारक पी. विजय शंकर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे. आरएसएसने आजवर अनेक अतिरेकी जन्मास घातले, माझ्याकडे त्याचे सर्व पुरावे आहेत, असा दावाही त्यांनी केला.

पी. विजय शंकर रेड्डी हे तब्बल 12 वर्षे आरएसएसचे पूर्णवेळ प्रचारक होते. त्यांच्या तेलगू भाषेतील निवेदनाचा मराठी अनुवाद भारत वाघमारे यांनी केला आहे. 12 वर्षे प्राचरक म्हणून काम केल्याच्या काळात अनेक अनुचित गोष्टी घडल्या. त्या गोष्टी चुकीच्या असल्याची मला जाणीव होताच मी आरएसएसला रामराम ठोकला. आरएसएसने बॉम्बस्फोट घडवण्यासारखी कृत्ये केली. त्या कृत्याचा मी देखील एक भाग होतो. माझ्याजवळ याबाबतचे सर्व पुरावे आहेत. आरएसएसने माझ्यावरच दोनवेळा प्राणघातक हल्लाही केला. आरएसएसचा काळा चेहरा जगासमोर आणण्यासाठी मी ‘देशभक्ती के नाम पर आरएसएस के काले कारनामे’ हे पुस्तक लिहिले आहे. आरएसएसचे काम असह्य झाल्याने काही जणांनी विष घेऊन तर काहींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या, असा दावाही पी. विजय शंकर रेड्डी यांनी केला आहे.

या सर्व गोष्टींबाबत सरसंघचालकाशी समोरासमोर चर्चा करायला तयार आहे. आरएसएसच्या कारनाम्यांमुळे निराश झालेले अनेक प्रचारक माझ्या संपर्कात आहेत. अशांना घेऊन लवकरच आरएसएसच्या बड्या नेत्यांच्या नावांचा खुलासा करणार आहे, असे विजय शंकर म्हणाले. हे वृत्त दैनिक लोकसत्ताच्या ऑनलाइन आवृत्तीने दिले आहे.

एक प्रतिक्रिया

  1. @
    Is Desh main agar kranti karni hai to hame sabhi hindu logone apane dimagse 33 cr. Devi devta ka dar aur in 33 cr. Apane dimagse nikalne honge tabhi kuch ho sakta hai
    @ Apane desh ko Angrejonse chutkara mila lekin ushike sath in bramhano ko bhi is desh se bhagana chahiyetha kunki sare fasad ki jad ye manuwadi atanki hai, ye is desh ke mulniwasi hai nahi lekin apane hinduonke dimakmain is chiz ko manneko tatar nahi ye sabse bedi shokantika hai.
    @ Pakisthan alag karke musalmano ko nikale Jane se achcha hota ki in manuwadiyonko yahase bhagaya hota

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा