महाराष्ट्रात आता फक्त १२०० रूपयांत कोरोनाची आरटीपीसी टेस्ट!

0
44
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः कोरोना विषाणू संसर्गाचे भांडवल करून रग्गड नफा कमावणाऱ्यांवर महाविकास आघाडी सरकारने टाच आणली असून आता कोरोनाची आरटीपीसी चाचणी केवळ १२०० रुपयांत होणार आहे.

 आधी महाराष्ट्रात कोरोनाची आरटीपीसी टेस्ट करण्यासाठी ४५०० रुपये आकारले जात होते. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून कमीत कमी खर्चात ही चाचणी कशी करता येईल, याचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते. तेव्हा या समितीने आरटीपीसी चाचणीचा दर ४५०० रुपयांवरून २२०० रुपयांवर आणला होता.

 शिंदे समितीच्या अहवालानुसार आरटीपीसी टेस्टचे दर कमी केल्यानंतरही सरकारने पुन्हा चाचणीचे हे दर कमी करण्याचा आग्रह धरला. डॉ. शिंदे यांच्याच समितीने पुन्हा आरटीपीसी टेस्टचे दर १२०० रुपयांवर आणण्याची शिफारस केली. त्यानुसार आज आरोग्य विभागाने खासगी चाचणी केंद्रात कोरोनाची आरटीपीसी टेस्ट केल्यास १२०० रुपयेच आकारावेत, असा आदेश जारी केला. घरून जर नमुने घेतले तर मात्र १६०० रुपये मोजावे लागतील, असे सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा