गुजरातेतील मोटेरा नव्हे, उत्तर कोरियातील रनग्रॅडो जगातील सर्वात मोठे स्टेडियम!

0
301
छायाचित्र सौजन्यः विकीपिडिया.

नवी दिल्लीः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी अहमदाबादेतील ज्या मोटेरा स्टेडियमवर त्यांचा नमस्ते ट्रम्प हा प्रचारकी इव्हेंट झाला, ते मोटेरा स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम असल्याची ओळख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिली खरी, परंतु मोटेरा हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम नसून उत्तर कोरियातील रनग्रॅडो स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. या स्टेडियमनची आसन क्षमता १ लाख ५० हजार इतकी आहे.

उत्तर कोरियातील प्योंगयांगमध्ये एका बेटावर रनग्रॅडो मे डे स्टेडियम उभारण्यात आलेले असून १९८९ मध्ये ते खुले करण्यात आले. या स्टेडियमवर फूटबॉल, ऍथलेटिक्ससह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मात्र या स्टेडियमचा वापर मुख्यतः परेड आणि वार्षिक क्रीडा स्पर्धांसाठी केला जातो. याच स्टेडियमवर १९८९ मध्ये १३ वा जागतिक युवा व विद्यार्थी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ५१ एकरमध्ये हे भव्यदिव्य स्टेडियम उभारण्यात आले आहे. या स्टेडिमच्या छतावर १६ कमानी असून त्याचा आकार मंगोलीयन फुलासारखा आहे.

मोटेरा स्टेडियम नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुजरातच्या अहमदाबादेतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमची आसन क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे. १९८३ मध्ये उभारण्यात आलेल्या या स्टेडियमची आसन क्षमता प्रारंभी ५४ हजार इतकी होती. २०१५ ते २०२० या काळात या स्टेडियमची पुनर्बांधणी करून त्याची आसन क्षमता १ लाख १० हजार इतकी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा