मोठी बातमीः युद्धग्रस्त युक्रेनच्या दोन शहरांत रशियाकडून तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा

0
20
छायाचित्रः twitter

कीव्ह/मॉस्कोः युक्रेन आणि रशियादरम्यान सलग दहाव्या दिवशीही युद्ध सुरूच आहे. या दरम्यान रशियन फौजांकडून युक्रेनवर अंदाधुंद बॉम्बहल्ले करण्यात येत असून युक्रेनच्या फौजाही रशियन फौजांना निकराने प्रत्युत्तर देत आहेत. रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीव्हवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात असतानाच रशियाने युक्रेनच्या दोन शहरांत तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. मारियूपोल आणि वोल्नोवाखा ही ती दोन शहरे असून युद्धविरामाच्या काळात या शहरांत अडकून पडलेले नागरिक बाहेर पडून सुरक्षित स्थळी पोहोचू शकतात.

 रणनितीच्या दृष्टीने युक्रेनचे महत्वाचे शहर मारियूपोलची रशियन फौजांनी मंगळवारपासूनच नाकाबंदी केली होती. रशियन फौजांनी केलेली नाकाबंदी आणि सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मारियूपोलच्या महापौरांनी अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी मानवतावादी कॉरिडॉरचे आवाहन केले होते. त्यानुसार रशियाने मारियूपोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांत मॉस्कोच्या प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजेपासून तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे, असे वृत्त रशियाच्या सरकारी वृत्त संस्थेने दिले आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रणनितीच्या दृष्टीने महत्वाचे शहर मारियूपोल आणि युक्रेनचे महत्वाचे बंदराचे शहर असलेल्या वोल्नोवाखामधून लोकांना बाहेर पडता यावे म्हणून निर्वासन मार्ग खुला करण्यास संमती दिल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र हा निर्वासन मार्ग किती काळ खुला राहील, याची स्पष्टोक्ती रशियन संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात देण्यात आलेली नाही.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

रशियन फौजांकडून सुरू असलेले हल्ले आणि नाकाबंदीमुळे मारियूपोल शहरातील लोकांचे बेहाल सुरू झाले आहेत. बहुतांश फोनसेवा ठप्प पडली आहे आणि अन्नपाण्याच्या टंचाईचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रशियाने घोषित केलेल्या या युद्धविरामामुळे या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेनुसार हा मानवी कॉरिडॉर दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहील, असे एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा