युक्रेन-रशिया युद्धः भारतीयांना ओलीस ठेवल्याचा दावा फेटाळला, खेरसनवर रशियन फौजांचा कब्जा

0
97
छायाचित्र सौजन्यः ट्विटर

कीव्ह/नवीदिल्लीः युक्रेन आणि रशियाच्या फौजांमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाची व्याप्ती सातत्याने वाढत चालली आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह आणि दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खारकीवमध्ये बॉम्बस्फोट सुरूच आहेत. अनेक शहरांत हवाई हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. रशियन फौजांनी खेरसन शहरावर कब्जा मिळवला आहे. त्याला युक्रेनने दुजोरा दिला आहे. दरम्यान, युक्रेनी फौजांनी भारतीयांना ओलीस ठेवल्याचा रशियाचा दावा भारताने फेटाळून लावला आहे.

 रशियन फौजांकडून सुरू असलेल्या गोळीबारामुळे युक्रेनच्या अनेक शहरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक रहिवासी इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे. रशियाचे सैनिक युक्रेनच्या ओडेशा शहराच्या दिशेने कुच करत चालले आहेत. खेरसन शहरावर रशियन फौजांनी कब्जा केल्याचे युक्रेनने मान्य केले आहे. आम्ही रशियन फौजांचे मोठे नुकसान केले आहे, असा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

तिकडे रशियाच्या मोठ्या शहरांमध्ये सातत्याने युद्धाचे सायरन वाजू लागले आहेत. तसेच सायरन युक्रेनच्या कीव्ह, चेर्निहाईव आणि चेर्निहाइव ओब्लास्टसह अनेक शहरांत वाजू लागले आहेत. हल्ल्यापासून वाचवण्यासाठी नजीकच्या बंकरमध्ये आश्रय घेण्याचा सल्ला लोकांना देण्यात आला आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दहा लाख लोकांचे पलायनः रशियाने हल्ला केल्यामुळे आतापर्यंत युक्रेन सोडून दहा लाख लोकांनी पलायन केले आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा आज गुरूवारी सातवा दिवस आहे. संयुक्त राष्ट्राच्या शरणार्थी संस्थेनेचे ही माहिती दिली आहे. या युद्धामुळे ४० लाख युक्रेनी लोकांना देश सोडून पलायन करावे लागू शकते, असेही या संस्थेने म्हटले आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनी नागरिक पोलंड, मोल्दोवा, रोमानिया, हंगेरी, स्लोवाकियामध्ये आश्रयाला गेले आहेत.

रशियाचा दावा भारताने फेटाळलाः भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये ओलीस ठेवण्यात आल्याचा रशियाचा दावा भारत सरकारने फेटाळून लावला आहे. युद्धग्रस्त युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या आम्ही सातत्याने संपर्कात आहोत, असेही भारत सरकारने स्पष्ट केले आहे. युक्रेनी फौजांनी खारकीव शहरात भारतीय विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या गटाला ओलीस ठेवल्याचा दावा रशियाने बुधवारी सायंकाळी केला होता. आम्हाला कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला ओलीस ठेवल्याची माहिती मिळालेली नाही. आम्ही खारकीव आणि आसपासच्या भागातील भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या पश्चिम भागात घेऊन जाण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्याची विनंती युक्रेनच्या अधिकाऱ्यांना केली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

खारकीव हे युक्रेनचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शह आहे. बुधवारी सायंकाळीच भारताने आपल्या नागरिकांना तत्काळ खारकीव सोडण्यास सांगितले होते. ज्या विद्यार्थ्यांना बस, रेल्वे मिळत नाही, त्यांनी पायीच निघावे आणि११ किलोमीटर पेसोचीन, १२ किलोमीटर दूर बाबे आणि १६ किलोमीटर दूर बेजलुडोवकामध्ये पोहोचावे, असेही भारत सरकारच्या वतीने बुधवारी सायंकाळी युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते. युक्रेनमध्ये जवळपास एक हजार भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा